शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बदनापूर आठवडी बाजाराचा वाद पुन्हा पेटला...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2016 00:49 IST

बदनापूर : येथील आठवडी बाजार मार्केट कमिटी परिसरातून गावात स्थलांतर करावा व हा बाजार जैसे थे ठेवावा, असे दोन वेगवेगळे मतप्रवाह निर्माण झाल्यामुळे शुक्रवारी बदनापुरात तणाव निर्माण झाला

बदनापूर : येथील आठवडी बाजार मार्केट कमिटी परिसरातून गावात स्थलांतर करावा व हा बाजार जैसे थे ठेवावा, असे दोन वेगवेगळे मतप्रवाह निर्माण झाल्यामुळे शुक्रवारी बदनापुरात तणाव निर्माण झाला होता. बदनापूर येथील आठवडी बाजार हा पूर्वी गावात व महामार्गावर भरवला जात होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून न्यायालयाच्या आदेशाने हा बाजार येथील मार्केट कमिटी परिसरात भरविण्यास सुरूवात केली. परंतु येथील नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व काही नगरसेवकांनी दोन दिवसांपुर्वी हा बाजार पुन्हा गावात भरविण्याबाबत ठराव २३ डिसेंबर २०१५ रोजीच्या सर्वसाधारण सभेत घेतल्याचे पत्र बदनापूर पोलिसांना देवून संरक्षणाचंी मागणी केली. त्यानंतर बचाव समितीचे अध्यक्ष पंकज जऱ्हाड यांनी हा बाजार गावात नेवू नये, जर हा बाजार पुन्हा स्थलांतरित केला तर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. तसेच छावाचे तालुका अध्यक्ष संजय जऱ्हाड यांनी हा बाजार मार्केट कमिटीच्या ठिकाणीच भरवावा नसता, छावाच्या वतीने तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला होता. त्यामुळे पुन्हा आठवडी बाजार भरविण्याबाबत संघर्ष सुरू झाला असल्याचे चित्र बदनापुरात दिसले. परिस्थितीचा विचार करून पोलिसांकडून शुक्रवारी बंदोबस्त ठेवण्यात आला. दरम्यान, या वादामुळे भाजीपाला विक्रेत्यांची फरफट झाली. (वार्ताहर)