शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

‘बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद अस्सल, शत्रुत्व पेरत नाही’

By admin | Updated: April 16, 2016 01:47 IST

औरंगाबाद : ‘आरएसएस- भाजपवाल्यांना त्यांचा राष्ट्रवाद लखलाभ. मी त्यांचा शत्रू नाही; पण हितचिंतक तर मुळीच होऊ शकत नाही. आंबेडकरवाद माझ्या मेंदूच्या कणाकणांत भरलेला आहे.

औरंगाबाद : ‘आरएसएस- भाजपवाल्यांना त्यांचा राष्ट्रवाद लखलाभ. मी त्यांचा शत्रू नाही; पण हितचिंतक तर मुळीच होऊ शकत नाही. आंबेडकरवाद माझ्या मेंदूच्या कणाकणांत भरलेला आहे. कारण बाबासाहेबांचा राष्ट्रवाद सगळ्या राष्ट्रभक्तांपेक्षा अस्सल आहे. त्यांचा राष्ट्रवाद माणूस घडवतो. शत्रुत्व तर अजिबात पेरत नाही,’ असे प्रतिपादन आज येथे ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, सिडको एन-१, एन-२, एन-३ व एन-४ च्या वतीने आयोजित मुख्य प्रबोधनात्मक कार्यक्रमात जगद्गुरू तुकाराम महाराज नाट्यगृहात बोलत होते. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित राष्ट्रवाद’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखक व विचारवंत प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे होते. सबनीस यांनी बाबासाहेबांच्या जीवनातील दु:खाच्या प्रसंगांची नोंद घेतली आणि ते सांगताना क्षणभर गहिवरले. त्यांचा कंठ दाटून आला. ‘सगळ्यांच्या डोळ्यांतील आसवे पुसणाऱ्या बाबासाहेबांच्या डोळ्यांतील अश्रू मात्र कुणालाच दिसले नाहीत; पण तरीही माणसे किती बलशाली होऊ शकतात, हे बाबासाहेबांवरून लक्षात येते. बाबासाहेबांची संवेदनशीलता टोकाची आहे. त्यांनी हिंदू धर्माची केलेली चिकित्सा टोकाची आहे. ते सर्व जातीयवादाच्या विरोधात होते,’ असे ते म्हणाले.सबनीस म्हणाले की, या देशात सत्याचा काळाबाजार मांडला गेला. अडीच हजार वर्षांपासून संस्कृतीच्या नावाखाली हे असत्य रुजविले गेले. त्यालाच श्रेष्ठ असे मानले गेले. हा क्रौर्याचा इतिहास असून, तो कधीही हिंदू धर्माला शोभादायक नाही. हे एक कल्चरल करप्शनचे कुरूप प्रकरण आहे. आजही धर्मांधता, उन्माद चालू आहे. सावरकरांचा राष्ट्रवाद सेक्युलर नाही. गांधींचा राष्ट्रवाद संभ्रमित आहे. गांधी-नेहरू आणि बाबासाहेबांमध्ये संवादाच्या अनेक जागा आढळून येतात. गांधी-नेहरू यांच्यामुळेच बाबासाहेबांना संविधान लिहिण्याची संधी मिळाली, हेही नाकारता येत नाही. प्रारंभी, पाहुण्यांच्या हस्ते बुद्ध, फुले आणि बाबासाहेबांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक त्रिशरण व पंचशील घेण्यात आले. गायक गौतम गवई यांनी स्वागतगीत गायले. कवी नारायण जाधव यांनी ‘काळ्या मनूच्या आम्हीच काळ्या लेकी’ ही कविता सादर करून प्रशंसा मिळवली. रतन धनेधर यांनी प्रास्ताविक केले. सुधाकर झिने यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अनुजा झिने यांनी आभार मानले, सुरेश दांडगे, अशोक गवळी, चरणदास बनसोड, अनिता हिवाळे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.