ऑस्ट्रेलिया शासनातर्फे ‘इनोवेशन पेटंट’ जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:07 IST2021-02-06T04:07:50+5:302021-02-06T04:07:50+5:30
औरंगाबाद : स्थानिक विद्युत् प्रवाह वापरुन त्वचेद्वारे शरीरात आयनिक औषधी संयुगे भरण्याचे तंत्र विकसित शहरातील विविध महाविद्यालयांच्या ८ प्राध्यापकांनी ...

ऑस्ट्रेलिया शासनातर्फे ‘इनोवेशन पेटंट’ जाहीर
औरंगाबाद : स्थानिक विद्युत् प्रवाह वापरुन त्वचेद्वारे शरीरात आयनिक औषधी संयुगे भरण्याचे तंत्र विकसित शहरातील विविध महाविद्यालयांच्या ८ प्राध्यापकांनी संशोधन केले असून ऑस्ट्रेलियाच्या सरकारने त्याची दखल घेतली आहे. आस्ट्रेलिया सरकारने त्यांच्या ‘आयन्टोफोरसिस डेटाच्या दूरस्थ देखरेखीसाठी इंटरनेट आधारित प्रणाली' या संशोधनाला ‘इनोवेशन पेटंट’ जाहीर केले आहे.
ऑस्ट्रेलिया शासनाने दिलेल्या या पेटंटची वैधता ८ वर्षासाठी असून या संशोधकांनी आता याच प्रणालीसाठी भारतीय पेटेंट मिळण्याकरीता देखिल नोंदणी केली आहे. हे तंत्र विकसित करणाऱ्या संशोधकांमध्ये डॉ. रफिक झकेरिया कॉलेज फॉर वूमन औरंगाबादचे प्राचार्य डॉ. मकदूम फारुकी, पीइएस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सहायक प्राध्यापिका सुरेखा विष्णुपंत मुंडे, मौलाना आझाद कॉलेजच्या भौतिकशास्त्र विभागाचे सहायक प्रा. खान अब्दुल वासे व शेख इफरा फातेमा अब्दुल हफिज, सर सय्यद कॉलेजच्या संगणकशास्त्र विभागाचे सहायक प्रा. मोमीन जकी मोहिउद्दीन, कन्नड येथील शिवाजी कॉलेजच्या भौतिकशास्त्र विभागाचे सहयोगी प्रा. शेख युसूफ हनीफ, जेएनइसी इंजिनीरिंग कॉलेजच्या भौतिकशास्त्र विभागाचे सहायक प्रा. खान अब्दुल मलिक व प्रा. क्रांती रामदास झाकडे यांच्या नावाने सदर पेटंटची नोंद झाली आहे. या संशोधकांनी याच प्रणालीसाठी भारतीय पेटेंट करीतादेखिल नोंदणी केली आहे.