Aurangbd: नितीन गडकरींच्या मंचावर 'स्वागतनाट्य', भाजप आमदार अतुल सावे भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 11:59 IST2022-04-24T11:56:38+5:302022-04-24T11:59:58+5:30

Aurangbd: भाजप नेते आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी आज औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते धुळे-सोलापूर हायवेचे लोकार्पण होणार आहे.

Aurangbd: drama on Nitin Gadkari's stage, BJP MLA Atul Save gets angry | Aurangbd: नितीन गडकरींच्या मंचावर 'स्वागतनाट्य', भाजप आमदार अतुल सावे भडकले

Aurangbd: नितीन गडकरींच्या मंचावर 'स्वागतनाट्य', भाजप आमदार अतुल सावे भडकले

औरंगाबाद: भाजप नेते आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी आज औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते धुळे-सोलापूर हायवेचे लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याला औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती आहे. दरम्यान, या कार्यक्रमात स्वागतावरुन नाराजीनाट्य पाहायला मिळाले. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत करीत असताना भाजप आमदार अतुल सावे यांचे नाव न घेतल्याने ते नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला निवेदिता यांनी स्वागतासाठी सर्व नेत्यांची नावे घेतली. पण, यावेळी औरंगाबाद पूर्वचे भाजप आमदार अतुल सावे यांच्यासह, नारायण कुचे आणि उदयसिंग राजपूत यांचे नाव घेण्याचे राहून गेले. 

यानंतर आमदार अतुल सावे चिडले आणि थेट निवेदिकेवर त्यांचे नाव विचारत भडकले आणि स्वागत करण्याच्या सूचना केल्या. यानंतर अतुल सावे आणि इतर आमदारांचे स्वागत झाले. अशारितीने सावे यांनी स्वतःचेच स्वागत करून घेतल्याचे यावेळी पाहायला मिळाले. 

Web Title: Aurangbd: drama on Nitin Gadkari's stage, BJP MLA Atul Save gets angry