शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
4
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
5
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
6
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
7
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
8
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
9
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
10
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
11
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
12
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
13
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
14
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
15
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
16
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
17
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
18
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
19
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत हवी फर्निचरची उद्यमनगरी

By admin | Updated: August 25, 2014 00:23 IST

नजीर शेख,औरंगाबाद जागा असेल तेथे फर्निचर उद्यमनगरी निर्माण करायला हवी, असे मत शेख आसेफ यांनी मांडले.

नजीर शेख,औरंगाबादआपल्या शहरातील व्यवसायाचा विचार केल्यास फर्निचर उद्योग हा आकार घेत असून आता शहरात किंवा शहर परिसरात जागा असेल तेथे फर्निचर उद्यमनगरी निर्माण करायला हवी, असे मत फर्निचर व्यावसायिक शेख आसेफ यांनी मांडले. फर्निचर व्यवसायातील अनेक कुशल कारागीर आपल्या शहरात असल्याचे शेख आसेफ यांनी यावेळी सांगितले. ‘माझ्या शहरात काय हवे?’ यासंदर्भात ते म्हणाले की, फर्निचर विक्री आणि फर्निचर उत्पादन या दोन्ही गोष्टी आपल्याकडे चालतात. विवाहानिमित्त लागणारे, आॅफिस फर्निचर, बेड, इंटेरिअर, खिडक्या, दरवाजे, शालेय फर्निचर, हॉस्पिटल फर्निचर, उद्योगांसाठी लागणारे पायलट बॉक्सेस आदींची शहरात विक्री आणि उत्पादन होते. यामध्ये स्टील आणि लाकडी (वूडन) असे दोन्ही प्रकार आहेत. शहरात फर्निचरची सुमारे १५० दुकाने असून या सर्वांची मिळून वार्षिक उलाढाल ही सुमारे सत्तर कोटींच्या आसपास असावी. एवढा मोठा व्यवसाय या शहरात विस्तारला आहे. गेल्या काही वर्षांत नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावला आहे, तसेच शहर आणि परिसरात नव्याने घरांची निर्मिती होत आहे. त्यामुळे नव्या घरांमध्ये नवे फर्निचर लागतेच त्यामुळे शहरात हा उद्योग वाढत आहे. शहरात अनेक ठिकाणी फर्निचर निर्मितीचे काम चालते. यामध्ये स्टीलचे फर्निचर हे छोट्या छोट्या कारखान्यांमध्ये तर लाकडी फर्निचर हे मिळेल त्या जागेत तयार केले जाते. या व्यवसायात अडीचशेच्या वर स्थानिक कारागीर आहेत. शिवाय, राजस्थान, उत्तर प्रदेश आदी राज्यांतून घरी, बंगल्यांमध्ये जाऊन फर्निचर तयार करणारे कारागीर वेगळेच आहेत. यामुळे ही संख्या आणखी वाढू शकते. या व्यवसायाचा हा पसारा असला तरी या व्यवसायाला म्हणून काहीच सवलती नाहीत. त्यामुळे केवळ फर्निचर व्यवसायासाठी औरंगाबादमध्ये उद्यमनगरी उभी राहिल्यास काही प्रमाणात सवलती मिळू शकतील व या व्यवसायाला उभारी मिळेल. आपल्याकडे चीनमध्ये तयार होणारे फर्निचरही मोठ्या प्रमाणावर येत आहे. त्याची किंमतही कमी असते. चीनमध्ये लघु उद्योजकांना सवलती आणि प्रोत्साहन आहे. आपल्याकडे तसा प्रकार नाही. यामुळे काही सवलती देऊन फर्निचर तयार करण्याच्या उद्योगाला चालना द्यायला हवी. आपल्याकडे लाकडी खुर्च्या, दरवाजे आणि सोफे तयार करणारे कुशल कारागीर आहेत. याठिकाणचे फर्निचर संपूर्ण मराठवाड्यात, तसेच बाहेरही जाते. औरंगाबादच्या तयार केलेल्या वस्तू इतर ठिकाणीही पसंत पडत आहेत. त्यामुळे या उद्योगाचा येथे आणखी विस्तार होऊ शकतो.