शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

वार्षिक ३०० कोटींची उलाढाल असणारे औरंगाबाद जिल्ह्यातील ९५ बाजाराचे बेहाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 18:56 IST

मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात ९५ आठवडी बाजार  भरतात. त्यांची एकूण वार्षिक उलाढाल तब्बल ३०० कोटींपेक्षा अधिक आहे. गावांच्या अर्थकारणाचा केंद्रबिंदू बनलेले हे आठवडी बाजार मात्र विकासापासून कोसो मैल दूर आहेत.

ठळक मुद्देथेट शेतकरी-ग्राहक आठवडी बाजारचा राज्य सरकार मोठा गाजावाजा करीत आहे. त्यासाठी मोठा खर्चही करण्यात येत आहे. आजही बहुतांश आठवडी बाजार रस्त्यावर, मोकळ्या जागेत भरविले जातात. या बाजारामध्ये मूलभूत सुविधा निर्माण करण्यास राज्य सरकार अपयशी ठरले आहे. 

- प्रशांत तेलवाडकर

औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात ९५ आठवडी बाजार  भरतात. त्यांची एकूण वार्षिक उलाढाल तब्बल ३०० कोटींपेक्षा अधिक आहे. गावांच्या अर्थकारणाचा केंद्रबिंदू बनलेले हे आठवडी बाजार मात्र विकासापासून कोसो मैल दूर आहेत. कारण, आजही बहुतांश आठवडी बाजार रस्त्यावर, मोकळ्या जागेत भरविले जातात. या बाजारामध्ये मूलभूत सुविधा निर्माण करण्यास राज्य सरकार अपयशी ठरले आहे. 

थेट शेतकरी-ग्राहक आठवडी बाजारचा राज्य सरकार मोठा गाजावाजा करीत आहे. त्यासाठी मोठा खर्चही करण्यात येत आहे. मात्र, वर्षानुवर्षे गावात भरणार्‍या आठवडी बाजाराकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहरात आठवडी बाजारांची आवश्यकता आहे; पण ग्रामीण अर्थकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या आठवडीबाजारात पायाभूत सुविधा निर्माण करून देण्यासाठी ना राज्य सरकार प्रयत्न करते ना स्थानिक ग्रामपंचायत, नगरपालिका प्रयत्न करते. यामुळे मागील वर्षानुवर्षे सुरूअसलेल्या आठवडी बाजारात ‘विकास’ कधी पोहोचलाच नाही.

औरंगाबाद जिल्ह्याचा विचार केला, तर येथील ९ तालुक्यांत मिळून ९५ आठवडी बाजार भरतात. त्यातील ४ आठवडीबाजार शहरात आहेत. याशिवाय औरंगाबाद तालुक्यात ७, फुलंब्री ७, सिल्लोड १२, पैठण ११, खुलताबाद ६, कन्नड १२, वैजापूर १६, गंगापूर १४ तर सोयगाव तालुक्यात ६ आठवडीबाजार भरविले जातात. या आठवडी बाजारांमध्ये स्थानिक व आसपासच्या पंचक्रोशीतील शेतकरी व व्यापारी कृषी माल व इतर साहित्य विक्रीसाठी आणतात. ताज्या भाजीपाल्यापासून ते कापसापर्यंत व कटलरीपासून ते मोबाईल एक्सेसरीज येथे विक्रीसाठी आणले जाते. या आठवडी बाजारचे महत्त्व लक्षात घेऊन  कृषी साहित्य उत्पादक कंपन्या, कीटकनाशक, बी-बियाणे कंपन्याही उत्पादन विक्रीसह येथे प्रचार-प्रसारासाठी येतात.

९५ आठवडी बाजारात मिळून वार्षिक ३०० कोटींपेक्षा अधिक उलाढाल होत असते. यावरून येथील अर्थकारणाचा अंदाज येऊ शकतो. बहुतांश आठवडी बाजार रस्त्यावर, गावातील मोकळ्या जागेत, मातीत, चिखल, नाल्याच्या बाजूला भरविले जातात. शेतकर्‍यांना, विक्रेत्यांना शेतीमाल विक्रीसाठी ओटे नाहीत. पत्र्याचे शेड तर दूरच राहिले. बांबूला ताडपत्री बांधून विक्रेते येथे व्यवसाय करीत असतात. पिण्याचे पाणीही विकत घ्यावे लागते.  बसण्याची जागाही स्वच्छ करून घ्यावी लागते. बहुतांश ठिकाणी लाईटची व्यवस्था नसल्याने सायंकाळ होताच विक्रेत्यांना व्यवसाय गुंडाळावा लागतो. ग्रामपंचायती, नगरपालिका फक्त आठवडी बाजाराचा ठेका देण्यापुरत्याच काम करतात. बाकी सोयीसुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष केले जाते. दोन वर्षांपूर्वी आठवडी बाजारांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी सरकारने योजना आणली होती; पण ‘कागदा’वरच राहिली. 

आठवडी बाजार सशक्तीकरणाचा निर्णय शेतकर्‍यांचे उत्पन्न दीडपट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ व २० फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय परिषद घेतली. यात देशातील २५० कृषी संशोधक, प्रशासकीय अधिकार्‍यांचा समावेश होता. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या नेतृत्वाखाली मी या परिषदेत सहभागी झालो होतो. देशातील आठवडीबाजार सशक्तीकरण करण्याचा निर्णय या परिषदेत घेण्यात आला. यासाठी २ हजार आठवडी बाजारात पथदर्शी प्रकल्प  राबविण्यात येणार आहे. या आठवडीबाजारातही ई-मार्केटिंग सुरू करण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला.-भगवानराव कापसे, गटशेती प्रणेते

शहरातील आठवडी बाजाराचे हालजिल्ह्यातील ग्रामीण भागात ९१ आठवडी बाजार भरविले जातात. औरंगाबाद शहरात ४ आठवडीबाजार वर्षानुवर्षापासून भरविले जात आहेत. रविवारचा जाफरगेट येथील आठवडी बाजार, सोमवारी पीरबाजार, गुरुवारी छावणीतील आठवडी बाजार, तर शुक्रवारी चिकलठाणा येथे आठवडी बाजार भरतो. यात छावणी परिषदेने विक्रेत्यांसाठी ओटे व पत्र्याचे शेड उभारले आहे. तसेच पीरबाजार येथे पत्र्याचे शेड व सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. जाफरगेट व चिकलठाणा येथील आठवडीबाजारात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. पडलेले ओटे, तुटलेले पत्र्याचे शेड, पिण्याचा पाण्याचा अभाव येथेही आहेच. 

कोणत्या वाराच्या दिवशी किती आठवडी बाजार भरविले जातात. १) रविवार -    १७२) सोमवार-    ८३) मंगळवार-    १३४) बुधवार-    १६ ५) गुरुवार-    १८ ६) शुक्रवार-    १३७) शनिवार-    १०

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद