औरंगाबादच्या पाणीपुरवठ्याची वीज पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 11:51 PM2018-02-08T23:51:59+5:302018-02-08T23:52:05+5:30

महापालिकेकडे तीन महिन्यांचे तब्बल १२ कोटी रुपयांचे वीज बिल थकीत असल्यामुळे गुरुवारी दुपारी महावितरण कंपनीने जायकवाडी येथील पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित केला. तथापि, पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर महापालिकेच्या अधिका-यांनी धावपळ करून महावितरणला थकबाकीपोटी ३ कोटी २६ लाख रुपयांचा हप्ता भरला.

Aurangabad water supply restored | औरंगाबादच्या पाणीपुरवठ्याची वीज पूर्ववत

औरंगाबादच्या पाणीपुरवठ्याची वीज पूर्ववत

googlenewsNext
ठळक मुद्दे१२ कोटींची थकबाकी : महानगरपालिकेने ३ कोटी २६ लाख रुपयांचा हप्ता भरला

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापालिकेकडे तीन महिन्यांचे तब्बल १२ कोटी रुपयांचे वीज बिल थकीत असल्यामुळे गुरुवारी दुपारी महावितरण कंपनीने जायकवाडी येथील पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित केला. तथापि, पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर महापालिकेच्या अधिका-यांनी धावपळ करून महावितरणला थकबाकीपोटी ३ कोटी २६ लाख रुपयांचा हप्ता भरला. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता महावितरणने वीजपुरवठा पूर्ववत सुरू केला.
यासंदर्भात महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर म्हणाले की, महापालिके ला दरमहा वीज बिल भरण्यासंबंधी नोटिसा दिल्या जातात. मागील तीन महिन्यांपासून महापालिकेकडे १२ कोटी रुपयांची विजेची थकबाकी आहे. यासंदर्भात आपण स्वत: मनपा अधिकाºयांना वीज बिल भरण्याबाबत बोललो. त्यानंतर पत्रव्यवहार केला; पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर आज दुपारी जायकवाडी येथील पाणीपुरवठ्याची वीज खंडित करण्यात आली. त्यानंतर मनपा अधिकाºयांनी धावपळ करून ३ कोटी २६ लाख रुपयांचा भरणा केला. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजेपासून खंडित केलेला पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला. उर्वरित थकबाकीची रक्कम तीन-चार दिवसांत देण्याचे मनपा अधिकाºयांनी आश्वासन दिले आहे. त्यानंतरही जर थकबाकीची रक्कम दिली नाही, तर पुन्हा वीजपुरठवठा खंडित करण्यात येईल, असेही मुख्य अभियंता गणेशकर म्हणाले.
अनेक भागांत पाण्यासाठी भटकंती; उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाई
यंदा जायकवाडी जलाशयात मुबलक पाणी असतानादेखील शहरातील अनेक भागांतील नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागत आहे. अगोदरच शहरात दोन दिवसआड पाणीपुरवठा केला जातो. त्यातही अपुºया पाणीपुरवठ्यामुळे छावणी परिसरालगत शांतीपुरा, नंदनवन कॉलनी, संगीता कॉलनी, भीमनगर, भावसिंगपुरा या भागांसह शहरातील अनेक भागांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या भागात ४५ मिनिटे पाणी सोडले जाते.
त्यातही १५ ते २० मिनिटे अगोदर पाण्याऐवजी नळाला हवाच येते. त्यानंतर अवघे २० ते २५ मिनिटेच पाणी येते तेही अत्यंत कमी दाबाने. त्यामुळे उन्हाळ्यापूर्वीच नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या भागांना पाण्याच्या टाकीतून पाणी सोडले जात नाही. रेल्वेस्टेशन येथून मुख्य जलवाहिनीतून पाणी सोडले जाते. त्यामुळे अत्यंत कमी दाबाने पाणी येते. त्यामध्ये आमचा दोष नाही, असे सांगून मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी वेळ मारून नेत आहेत.

Web Title: Aurangabad water supply restored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.