औरंगाबाद- नगर महामार्गावरील तिहेरी अपघातात २२ जण जखमी; रुग्णालयात केले दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 17:36 IST2022-05-05T17:36:47+5:302022-05-05T17:36:52+5:30
या तिहेरी अपघातामुळे औरंगाबाद नगर महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली होती.

औरंगाबाद- नगर महामार्गावरील तिहेरी अपघातात २२ जण जखमी; रुग्णालयात केले दाखल
औरंगाबाद - नगर महामार्गावरील ईसारवाडी फाट्याजवळ नेवासा तालुक्यातुन पैठणकडे लग्न वऱ्हाड घेऊन जाणारी स्कूल बस पैठण कडे जाणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या टँकरला पाठीमागून धडकल्याने त्याच मार्गावरून धावणारी प्रवासी वाहतूक ट्रॅव्हल्स स्कूलबस ला पाठीमागून धडकल्याने झालेल्या तिहेरी अपघातात स्कूल बस मधील तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स मधील 20 ते 22 नागरिक जखमी झाले असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
सदर जखमींना स्थानिक ग्रामस्थ शिवसेनेचे जिल्हासंघटक गणेश राऊत, सरपंच जालींदर राऊत, गणेश खाटक, .पाडूंरंग भुसारे, महेश शिंदे आदी ग्रामस्थांनी तसेच पोलीस प्रशासनाच्या मदतीने 108 व खासगी वाहनातून जखमींना औरंगाबाद शहरातील घाटी रुग्णालयकडे रवाना करण्यात आले आहे. या तिहेरी अपघातामुळे औरंगाबाद नगर महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली होती.