शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आॅगस्ट हिटने नांदेडकर त्रस्त

By admin | Updated: August 18, 2014 00:33 IST

नांदेड : पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे चिंतेत असलेल्या नागरिकांना सध्या आॅगस्टमध्येच हीटचा अनुभव येत आहे़

नांदेड : पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे चिंतेत असलेल्या नागरिकांना सध्या आॅगस्टमध्येच हीटचा अनुभव येत आहे़ वास्तवीक आॅक्टोबर महिन्यातील हीट दोन महिन्यापूर्वीच जाणवत असल्याने नांदेडकर मात्र त्रस्त झाले आहेत़ यंदाच्या पावसाळ्यात अडीच महिन्याच्या कालावधीत केवळ २० टक्के पाऊस झाला आहे़ त्यामुळे अनेक भागातील पेरण्या खोळंबल्या आहेत़ आता या पेरण्या होणार नाहीत़ परिणामी हजारो हेक्टर शेती पडीक ठेवावी लागणार आहे़ तर दुसरीकडे अल्प पावसावर पेरण्या केलेल्या शेतकरी पिकांच्या वाढीसाठी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत़ सोयाबीन, मूग, कापसाची पिके पाण्याअभावी करपून जात आहेत़ दिवसा कडक उन्हाचे चटके तर रात्री शुभ्र आकाशात लुकलकणाऱ्या चांदण्या पाहून शेतकरी हतबल झाला आहे़ ग्रामीण भागात हे चित्र तर शहरात पिण्याच्या पाण्याचे संकट भेडसावत आहे़ मागील पंधरा दिवसापासून तापमानात वाढ झाली आहे़ सकाळपासून उन्हाचे चटके बसत आहेत़ रात्री उशिरापर्यंत उकाडा जाणवत आहे़ त्यामुळे नागरिक घामाघुम होत आहेत़ पावसाळा लागताच काढून टाकलेले कुलर अनेकांनी पुन्हा लावले आहेत़ विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानंतर या त्रासात अधिकच भर पडत आहे़ (प्रतिनिधी)