शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

हंगामी वसतिगृहांची हजेरी ‘कागदा’वरच!

By admin | Updated: December 8, 2015 00:07 IST

संजय तिपाले , बीड हंगामी वसतिगृहांमधील बोगसगिरीला आळा बसावा यासाठी लाभार्थ्यांच्या नोंदी बायोमेट्रिक यंत्राद्वारे घेण्याचे आदेश शिक्षण विभागाने काढले;

संजय तिपाले , बीडहंगामी वसतिगृहांमधील बोगसगिरीला आळा बसावा यासाठी लाभार्थ्यांच्या नोंदी बायोमेट्रिक यंत्राद्वारे घेण्याचे आदेश शिक्षण विभागाने काढले;परंतु वसतिगृहे सुरु होऊन सव्वा महिन्यांचा कालावधी उलटूनही विद्यार्थी उपस्थितीच्या नोंदी रजिस्टरमध्येच घेणे सुरु आहे. त्यामुळे पारदर्शकर्तेवर प्रश्नचिन्ह कायम आहे.१ आॅक्टोबर ते ३१ मार्च या सहा महिन्यांच्या कालावधीत ऊसतोड कामगार रोजगारासाठी स्थलांतर करतात. त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाची अबाळ होऊ नये, यासाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत हंगामी वसतिगृृहे चालविली जातात. यावर्षी शासनाने विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याची अट शिथिल केली आहे. नातेवाईकांकडे राहून केवळ जेवण व इतर सुविधा घेण्यासाठी वसतिगृहांचा आधार घ्यावा, असे अपेक्षित आहे. एका विद्यार्थ्यावर सहा महिन्यांत तब्बल ८ हजार २०० रुपये खर्चाची तरतूद आहे.आराखड्यात २५ हजार ६०० इतक्या विद्यार्थ्यांसाठी २० कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. मात्र, अद्याप ना विद्यार्थ्यांसाठीचे अनुदान आले ना उपस्थितीची नोंद घेण्यासाठी खरेदी करावयाच्या बायोमेट्रिक यंत्रासाठी! एका यंत्रासाठी अडीच हजार रुपयांचा खर्च होऊ शकतो. जिल्ह्यात ५४३ वसतिगृहे सुरु असून त्यासाठी १३ लाख ५७ हजार ५०० रुपये इतक्या निधीची आवश्यकता आहे.हंगामी वसितगृहात पहिली ते आठवीपर्यंतची मुले राहू शकतात. गतवर्षी २३ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी वसतिगृहांचा आश्रय घेतला होता. यंदा या आकड्यात ९ हजार विद्यार्थी वाढले आहेत.४३२ हजार ८४६ विद्यार्थी हंगामी वसतिगृहात असल्याची नोंद सर्व शिक्षा अभियानच्या दफ्तरी आहे. दुष्काळी स्थिती असल्याने स्थलांतर वाढले असून परिणामी विद्यार्थीसंख्याही वाढल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.