शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
4
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
5
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
6
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
7
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
8
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
9
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
10
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
11
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
12
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
13
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
15
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
16
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
17
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
18
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
19
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
20
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 

पुन्हा एका साधूवर जीवघेणा हल्ला; श्रीराम टेकडीवरील महाराजांना गावकऱ्यांकडून जबर मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 3:08 PM

Attack on a Sadhu again in Aurangabad : दिंडीतील गावकरी व  टेकडीवरील नागा साधू महंत गणेशगिरी महाराज (पंच दशनाम जुना आखाडा, उत्तराखंड) यांच्यात बाचाबाची होऊन प्रकरण चिघळले

ठळक मुद्देमहाराजांनी अरेरावी केली; गावकऱ्यांनी सांगितले कारणेवर्षभरापासून गावकऱ्यांचा त्रास; महाराजांच्या भक्तांचा आरोप  

पैठण (औरंगाबाद ) :  पैठण तालुक्यातील मेहरबान तांडा येथील श्रीराम टेकडीवरील नागा साधू महंत गणेशपुरी महाराज यांच्यावर निलजगाव येथून दिंडी घेऊन गेलेल्या शेकडो गावकऱ्यांनी शुक्रवारी लाठ्या काठ्यासह तुफान दगडफेक करीत जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात महाराज गंभीर झालेल्या महाराजांना भक्तांनी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान, बीडकीन पोलिस ठाण्यात या गंभीर घटनेची अद्याप कसलीच नोंद घेण्यात आलेली नाही. मात्र, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून गावकरी आणि भक्तांकडून एकमेकांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

शुक्रवारी मोक्षदा एकादशीच्या मुहूर्तावर निलजगाव ( ता. पैठण ) येथील गावकरी दर्शनासाठी मेहरबान नाईक तांडा येथील श्रीराम टेकडीवर दर्शनासाठी गेले होते. या दरम्यान दिंडीतील गावकरी व  टेकडीवरील नागा साधू महंत गणेशगिरी महाराज (पंच दशनाम जुना आखाडा, उत्तराखंड) यांच्यात बाचाबाची होऊन प्रकरण चिघळले व गावकरी आक्रमक झाले. यानंतर महंत गणेशपुरी महाराज दोन्ही हातात तलवार घेऊन गावकऱ्यासमोर उभे राहिले. महाराजांनी तलवार काढल्यानंतर गावकऱ्यांनी महाराजांवर दुरूनच तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत महाराज गंभीर जखमी झाले. यानंतर काही जेष्ठ नागरिकांनी समजूत घालून गावकऱ्यांना माघारी पाठवून गंभीर जखमी महाराजांना उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात हलवले.

महाराजांनी अरेरावी केली; गावकऱ्यांनी सांगितले कारणेगावकऱ्यांच्या म्हण्यानुसार, शुक्रवारी मोक्षदा एकादशी असल्याने निलजगाव येथून दर्शनासाठी महिला व पुरूषांची दिंडी श्रीराम टेकडीवर गेली होती. दिंडीतील महिला टेकडीवर फराळ करण्यासाठी बसल्या असता महाराजांच्या मालकीची एक गाय या महिलांमध्ये घुसली. महिलांना त्रास होऊ नये म्हणून एका गावकऱ्याने तेथून गाय हुसकावून लावली. गायीला हुसकावून लावल्याचा महाराजांना राग आला. त्यांनी गाय हुसकावणाऱ्या गावकऱ्यास दोन काठ्या मारल्या. याचा जाब विचारताच महाराज अरेरावी करत तलवार घेऊन धाऊन आले. यानंतर गावकरी घाबरले व त्यांनी दगडफेक केली असे गावकरी सांगत आहेत.

वर्षभरापासून गावकऱ्यांचा त्रास; महाराजांच्या भक्तांचा आरोप  तर या उलट महाराजांनी श्रीराम टेकडीचा केलेला विकास व टेकडीला आलेले तीर्थक्षेत्राचे स्वरूप लक्षात घेता निलजगाव येथील गावकरी गेल्या वर्षभरापासून कुरापती काढून महाराजांना दमदाटी करत आहेत. यातूनच महाराजांवर शुक्रवारी गावकऱ्यांनी हल्ला केला असे महंत गणेशगीरी महाराजांच्या शिष्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या प्रकरणाबाबत बीडकीन पोलीस ठाणे अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. एवढे मोठे प्रकरण होऊन गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुध्दा ठाण्यात या बाबत कसलीच नोंद घेण्यात आलेली नव्हती. पोलीसांच्या या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस