शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
2
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
3
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
4
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
5
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
6
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
7
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
8
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
9
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
10
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
11
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
12
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
13
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
14
'तामिळनाडूत नव्या युगाचा आरंभ'; विजय यांच्याकडून धडाकेबाज निर्णय; तरुण कीर्तनांनी वेधले लक्ष
15
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
16
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
17
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
18
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
19
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
20
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

राकाँच्या गावांत बाण

By admin | Updated: May 21, 2014 00:49 IST

परभणी: परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये नरेंद्र मोदी यांची त्सुनामी लाट दिसून आली. या लाटेत राष्ट्रवादीच्या नेते मंडळींच्या गावातही बाणाला आघाडी मिळाली.

परभणी: परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये नरेंद्र मोदी यांची त्सुनामी लाट दिसून आली. या लाटेत राष्ट्रवादीच्या नेते मंडळींच्या गावातही बाणाला आघाडी मिळाली. या मतदारसंघात जवळपास ५५ गावे आणि परभणी शहराचा समावेश होतो. परभणी शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला १७ हजारांची आघाडी मिळाली असली तरी ग्रामीणमध्ये शिवसेनेला ७ हजार ३२० मतांची आघाडी होती. ग्रामीण भागातील झालेल्या मतदानावर दृष्टीक्षेप टाकला असता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या काही पदाधिकार्‍यांच्या गावातही शिवसेनेला भरघोस आघाडी मिळाली. तर अनेक ठिकाणी चुरशीची लढत झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष स्वराजसिंह परिहार यांच्या झरी गावात भांबळे यांना २२०२ तर जाधव यांना २४९८ मते मिळाली. या गावात शिवसेना २९६ मतांनी आघाडीवर होती. परभणी पंचायत समितीच्या माजी सभापती लोफामुद्रा मोरे यांच्या साडेगावात मात्र नाममात्र ३६ मतांची आघाडी भांबळे यांना मिळाली. जि. प. सदस्य दिनेश बोबडे यांच्या टाकळी बोबडे या गावात शिवसेनेला ३५ मतांची आघाडी आहे. पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब रसाळ यांच्या नांदापूरमध्ये भांबळे यांना १११ मतांची आघाडी आहे. या पट्ट्य़ातील टाकळी कुंभकर्ण हे मोठे गाव. या ठिकाणी काँग्रेसचे जि.प. सदस्या जैस्वाल आणि प्रभाकर जैस्वाल यांचे गाव. तसेच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाले बंधुचे वर्चस्व. या ठिकाणीही शिवसेनेला ७४४ मतांची भरघोस आघाडी मिळाली. धर्मापुरीत ५४९, पिंपळी कोथाळा ३, जोडपरळी १४५, सावंगी ३५०, संबर ४४५, मांगणगाव २२७, वाडी दमई येथे २२३, करडगावात १११, धारणगाव १५७, साटलामध्ये १३६, धारमध्ये ६३, दुरडीत ३०, मुरुंबा २३८ तर सुकापूरवाडी येथे शिवसेनेला १७९ मतांची आघाडी मिळाली होती. पिंपळगाव टोंग येथे शिवसेनेला २१, देवठाणा ११६, नांदगाव खु. मध्ये १६५, साबामध्ये ७, वांगी २१०, नांदखेडा १०५, कारेगावमध्ये ८४, राहटीत ३२७, आलापूर पांढरीत १७४, धनगरवाडीत २३४, पिंपरी देशमुखमध्ये ४३५, बाभळीत ६१८, मिरखेलमध्ये २५५, पोरजवळ्यात २८५ तर ताडलिमला येथे शिवसेनेचे उमेदवार बंडू जाधव यांना ४६१ मतांची आघाडी मिळाली होती. तट्टुजवळा येथे २०३, शेंद्रा येथे ९४, बलसा ५८, रायपूर १३०, ब्राह्मणगाव २५८, ब्रह्मपुरीतर्फे लोहगाव ११९, कौडगाव २२९, पारवा येथे शिवसेनेला ५६४ मतांची आघाडी मिळाली. परभणी विधानसभा मतदारसंघात जांब हे मातब्बर नेते मंडळींचे गाव म्हणून ओळखले जाते. शिवसेनेच्या आ.मीराताई रेंगे, कल्याणराव रेंगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जि. प. गटनेते बाळासाहेब जामकर, परभणी मनपा स्थायी समितीचे सभापती विजय जामकर, माजी खासदार तथा कॉंग्रेस नेते तुकाराम रेंगे पाटील यांचे हे गाव. या गावामध्ये कुणाला आघाडी मिळते, याबद्दल उत्सुकता होती. या गावात राष्ट्रवादीचे विजय भांबळे यांना ११५२ मते तर शिवसेनेचे संजय जाधव यांना ७६० मते मिळाले. या गावात राष्ट्रवादी काँग्रेसला ३९२ मतांची आघाडी आहे. असोला हे गाव परभणी बाजार समितीचे उपसभापती तथा काँग्रेसचे युवा नेते आनंद भरोसे, नगरसेवक शिवाजी भरोसे यांचे गाव. या गावात मात्र राष्ट्रवादीला ९२६ तर शिवसेनेला ५६१ मते मिळाली. असोल्यात राष्ट्रवादीला ३६५ मतांची आघाडी आहे. कारेगाव हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोपानराव अवचार यांचे गाव. कारेगावमध्ये राष्ट्रवादीला ८२९ त२ शिवसेनेला ९१३ मते मिळाली. बाणाला ८४ मतांची आघाडी आहे.