मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत तलवार फिरवणाऱ्या तरुणाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:27 IST2020-12-17T04:27:52+5:302020-12-17T04:27:52+5:30

शेख मुदस्सीर शेख खादिक (१९, रा. रहेमानिया कॉलनी), असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीचा साथीदार इलियास ऊर्फ इल्लू ...

Arrested for brandishing a sword at a friend's birthday party | मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत तलवार फिरवणाऱ्या तरुणाला अटक

मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत तलवार फिरवणाऱ्या तरुणाला अटक

शेख मुदस्सीर शेख खादिक (१९, रा. रहेमानिया कॉलनी), असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीचा साथीदार इलियास ऊर्फ इल्लू अझहर मौलवी पटेल (२०, रा. रहेमानिया कॉलनी) हा पोलिसांना पाहून पसार झाला.

किराडपुरा येथील मैदानावर रियाज नावाच्या तरुणाचा वाढदिवस साजरा केला जात आहे. या पार्टीमध्ये मुदस्सीर आणि इल्लू ऊर्फ इलियास तलवार फिरवीत असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. यानंतर पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, उपनिरीक्षक दत्ता शेळके, कर्मचारी संपत राठोड, संजय गावडे, हारुण शेख, धनंजय पाडळकर, नंदू चव्हाण, संतोष बमनावत यांच्या पथकाने तेथे धाव घेतली. पोलिसांना पाहून इल्लू ऊर्फ इलियासने धूम ठोकली, तर आरोपी मुदस्सीरला तलवारीसह पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध जिन्सी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस इल्लूचा शोध घेत आहेत. (फोटोसह)

Web Title: Arrested for brandishing a sword at a friend's birthday party