शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील चार महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:11 IST

भगवान कॉलेज ऑफ फार्मसी : तंत्रशिक्षण सहसंचालकांची कार्यवाही औरंगाबाद : शासनाच्या आदेशानुसार भगवान कॉलेज ऑफ फार्मसीमधील द्वितीय व तृतीय ...

भगवान कॉलेज ऑफ फार्मसी : तंत्रशिक्षण सहसंचालकांची कार्यवाही

औरंगाबाद : शासनाच्या आदेशानुसार भगवान कॉलेज ऑफ फार्मसीमधील द्वितीय व तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांंना जिल्ह्यातील चार फार्मसी कॉलेजमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. महेश शिवणकर यांनी दिली.

मागील दोन वर्षांपूर्वी सन २०१८-१९मध्ये अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने येथील भगवान कॉलेज ऑफ फार्मसीची मान्यता काढली होती व या कॉलेजमधील विद्यार्थ्यांना मान्यताप्राप्‍त संस्थांमध्ये ३० दिवसांत समायोजित करण्याचे आदेश दिले होते. तथापि, या निर्णयास रेणुका संजय आंबेकर व इतर विद्यार्थ्यांनी औरंगाबाद खंठपीठात आव्हान दिले. याप्रकरणी उच्च न्यायालयाने २ नोव्हेंबर २०१८ रोजी नवी दिल्ली येथील अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, राज्य शासन, संबंधित व्यवस्थापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढील शैक्षणिक वर्षापर्यंत सर्वसमावेशक तोडगा काढावा, असे निर्देश दिले होते. त्यानंतर १३ मार्च २०१९ रोजी झालेल्या सुनावणीच्यावेळी भगवान कॉलेज ऑफ फार्मसीने सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी संस्था पुढे चालू ठेवण्याबाबत अर्ज दाखल केला नव्हता. त्यामुळे न्यायालयाने संस्थेच्या उत्तराची वाट न पाहता शासनाने योग्य पाऊले उचलावीत, असे निर्देश दिले.

येथील दुसर्‍या व तिसर्‍या वर्षाच्या बॅकलॉग विद्यार्थ्यांनी औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्‍न औरंगाबाद शहर अथवा जवळच्या फार्मसी कॉलेजेसमध्ये वर्ग करण्याची विनंती शासनाकडे केली होती. त्यानुसार शासनाने काल १ फेब्रुवारीला एका आदेशाद्वारे या कॉलेजमधील प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील फार्मसी कॉलेमध्ये रिक्‍त जागांवर वर्ग करण्याचे आदेश जारी केले आहेत. फार्मसी कॉलेजेसमध्ये रिक्‍त जागा नसल्यास फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या मान्यतेच्या अधीन राहून १० टक्के वाढीव जागांच्या मर्यादेत गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यात यावे, असे निर्देशही शासनाने दिले आहेत. त्यानुसार तंत्रशिक्षण कार्यालयाने जिल्ह्यातील ४ फार्मसी कॉलेजेसमध्ये या विद्यार्थ्यांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू केली आहे.

चौकट...

विद्यार्थी हिताचा निर्णय

यासंदर्भात तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. महेश शिवणकर म्हणाले की, या महाविद्यालयातील २५-३० विद्यार्थ्यांचाच प्रश्न आहे. राज्य शासनाने या विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आम्ही जिल्ह्यातील चार फार्मसी कॉलेजेसमध्ये या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अन्यथा आम्ही मराठवाड्यात जिथे जागा शिल्लक आहेत, त्याठिकाणी प्रवेश दिला असता.