शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

हजारो रुपयांचे अर्ज धूळखात

By admin | Updated: June 17, 2014 01:10 IST

संतोष हिरेमठ , औरंगाबाद प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) लर्निंग लायसन्स, कायमचे लायसन्स, योग्यता प्रमाणपत्र, वाहन नामांतरसह विविध कामांसाठी वाहनधारकांना अर्ज भरावे लागतात.

संतोष हिरेमठ , औरंगाबादप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) लर्निंग लायसन्स, कायमचे लायसन्स, योग्यता प्रमाणपत्र, वाहन नामांतरसह विविध कामांसाठी वाहनधारकांना अर्ज भरावे लागतात. वाहनधारकांना हे अर्ज आरटीओ कार्यालयाच्या वतीने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून हजारो रुपयांचे अर्ज धूळखात पडल्याने वाहनधारकांना परिसरातील झेरॉक्स सेंटरवरून अर्ज विकत घ्यावे लागत आहेत. आरटीओ कार्यालयाच्या परिसरात वाहन चालविण्याची चाचणी होणाऱ्या ट्रॅकजवळ असलेल्या गोदामात गेल्या अनेक वर्षांपासून विविध नमुन्यांचे अर्ज धूळखात पडलेले आहेत.आरटीओ कार्यालयात विविध कामांसाठी आलेल्या वाहनधारकांना पहिल्यांदा अर्ज भरावा लागतो. हे अर्ज आरटीओ कार्यालयातून मिळणे आवश्यक आहे. परंतु अशा पद्धतीने अर्ज पडून असतानाही तो वाहनधारकांना उपलब्ध होत नसल्याचे दिसून येते. झेरॉक्स अर्जांवर कामकाजआरटीओ कार्यालयात झेरॉक्स अर्जांचा वापर वाढत आहे. त्यामुळे कार्यालयातील कामकाज झेरॉक्स अर्जावरच बिनदिक्कत सुरू आहे. अशा पद्धतीच्या कामकाजाकडे अधिकाऱ्यांचे लक्ष जात नसल्याचे दिसत आहे.हजारो रुपये वायाअर्ज छापण्यापासून ते कार्यालयात आणण्यापर्यंत हजारो रुपये खर्च झाली; परंतु त्यांचे वेळीच वितरणाकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे गेल्या काही वर्षांत अनेक अर्जात बदलही झाले असतील. ‘राज्यात वापरलेल्या किंवा वापरण्यासाठी ठेवलेल्या मोटार वाहनांच्या बाबतीत द्यावयाचा प्रतिज्ञापत्राचा नमुना’ असे विविध अर्ज जीर्ण झाले आहेत किंवा फाटून गेले आहेत. त्यामुळे असे अर्ज आता वापरता येणार नसल्याने हजारो रुपये वाया गेल्याची स्थिती दिसून येते.वीस रुपयांपर्यंत अर्जविविध कामांसाठी २ रुपयांपासून २० रुपयांपर्यंत विविध अर्जांची विक्री परिसरात होत आहे. आरटीओ कार्यालयात अर्ज मिळत नसल्याची कल्पना आता वाहनधारकांना आली आहे. त्यामुळे वाहनधारक आरटीओ कार्यालयात आल्यावर अर्जासाठी सरळ झेरॉक्स सेंटरवर जातात. अनेक वेळा सुट्या पैशांअभावी अर्ज घेण्यात अडचणी येत असल्याचे दिसून येते.कधीतरी उपयोगात येणारे अर्जधूळखात पडून असलेले अर्ज कधीतरी कामी पडणारे असतात. त्यामुळे वाहनधारकांकडून त्याची मागणी कमी असल्याने ते पडून असल्याचे सांगितले जाते.धूळखात पडून असलेले अर्ज कोणते आहेत, त्याचा आता वापर होऊ शकतो की नाही, याची पाहणी करावी, तसेच अर्जांची योग्य छाननी करून वापरण्यायोग्य अर्ज वाहनधारकांना उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी होत आहे.अर्ज मोफत मिळावेतआरटीओ कार्यालयात मोफत अर्ज मिळण्याची आवश्यकता असताना ते झेरॉक्स सेंटरवरून विकत घ्यावे लागत आहेत. तर दुसरीकडे अनेक वर्षांपासून अर्ज धूळखात पडून आहेत. हे अर्ज वापरण्यायोग्य असून ते वाहनधारकांना मोफत मिळाले पाहिजेत.- एस. के. खलील, कार्याध्यक्ष, रिक्षाचालक संयुक्त संघर्ष कृती समितीओरिजनल अर्ज मिळावेतआरटीओ कार्यालयात झेरॉक्स अर्ज घेण्याची वेळ येत आहे; परंतु ओरिजनल अर्ज मिळाले पाहिजेत. त्यामुळे गोदामात पडून असलेले अर्ज बाहेर काढून वाटप केले पाहिजे.-बुद्धिनाथ बराळ, अध्यक्ष, लाल बावटा रिक्षाचालक कामगार युनियनमाहिती घेतली जाईलअर्ज पडून असल्याबाबत माहिती घेतली जाईल. अर्ज उपलब्ध असले तरी ते वाटण्यासाठी आरटीओ कार्यालयाकडे कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. जर उपलब्ध असल्यास मोफत दिले जातील.- गोविंद सैंदाणे, प्रादेशिक परिवहन अधिकारी