शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीसाठी नोंदणीचे व्यापाऱ्यांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2017 00:27 IST

नांदेड: वस्तू व सेवाकर कायद्याबाबत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य वस्तू व सेवाकर कार्यालयात मदत केंद्राची स्थापना करण्यात आली असून जीएसटीत पात्र व्यापाऱ्यांनी त्वरित नोंदणी करावी,

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: वस्तू व सेवाकर कायद्याबाबत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य वस्तू व सेवाकर कार्यालयात मदत केंद्राची स्थापना करण्यात आली असून जीएसटीत पात्र व्यापाऱ्यांनी त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन सहआयुक्त मा़म़ कोकणे यांनी केले़वस्तू व सेवाकर मदत केंद्रात अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे़ या केंद्रात व्यापाऱ्यांना या कायद्याबाबत येणाऱ्या अडचणींचे निराकरण करता येणार आहे़ तसेच व्यापाऱ्यांना या कायद्यात नोंदणी क्रमांक व नोंदणी अर्ज नि:शुल्क भरुन देण्यात येत आहे़ १ जुलैपासून या कायद्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली असून त्यानुसार राज्यातील कर गोळा करण्याची जबाबदारी राज्य वस्तू व सेवाकर कार्यालयावर सोपविण्यात आली आहे़ त्यासाठी विविध कार्यक्रमांद्वारे जिल्ह्यात जनजागृती व शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे़ नोंदणीसाठी दोन राज्य कर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून या अधिकाऱ्यांना नांदेड विभागातील नवीन नोंदणी अर्ज मंजूर करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत़ नोंदणी प्रक्रिया पूर्ण करुन जीएसटी क्रमांक देण्यात येत आहे़ वस्तू व सेवाकर कायद्यानुसार राज्यात नोंदणी घेण्याची वार्षिक उलाढाल २० लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे़