शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
2
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
3
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
4
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
5
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
6
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
7
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
8
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
9
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
10
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
11
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
12
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
13
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
14
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
15
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
16
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
17
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
18
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
19
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
20
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

भक्तिगीतात रंगला वर्धापन दिन

By admin | Updated: April 18, 2016 01:28 IST

औरंगाबाद : ब्राह्मण महिला मंचच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त नुकताच बलवंत वाचनालय येथे कार्यक्रम घेण्यात आला.

औरंगाबाद : ब्राह्मण महिला मंचच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त नुकताच बलवंत वाचनालय येथे कार्यक्रम घेण्यात आला. भजन स्पर्धेचे आयोजन करून या कार्यक्रमाची गोडी आणखी वाढविण्यात आली. याप्रसंगी डॉ. स्वाती शिरडकर, अ‍ॅड. स्मिता नगरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मंचच्या अध्यक्षा विजया कुलकर्णी यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित महिलांशी संवाद साधताना डॉ. शिरडकर यांनी सृदृढ शरीरासोबतच सुदृढ मन असणे किती महत्त्वाचे असते, ते समजावून सांगितले. सकारात्मक पद्धतीने कार्य करण्यासाठी मानसिक आरोग्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्या म्हणाल्या. त्यासाठी आवश्यक असणारे उपायदेखील त्यांनी सोप्या शब्दांत सांगितले. अ‍ॅड. नगरकर यांनी कायदेविषयक माहिती दिली. यावेळी चैत्रगौरीच्या हळदी-कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात घेण्यात आला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १३ महिलांना ‘मी स्वामिनी, मी रणरागिणी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये नलिनी पिंपळे, वंदना कुलकर्णी, नीता हेलसकर, जया सांपदे, शीतल सराफ, अनुराधा देशपांडे, जया न्यायाधीश, सुरेखा बक्षी, सुरेखा दीक्षित, लोंढे, विजया पाटील, वंदना देशमुख, अर्चना झाल्टे या महिलांचा गौरव करण्यात आला. भक्तिगीत स्पर्धेत माधुरी लासूरकर यांना प्रथम पुरस्कार मिळाला, तर हर्षदा धारवाडकर, ऐश्वर्या जोशी यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय पुरस्कार पटकावला. वैशाली काळे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तसेच आरंभ बचत गटाने सादर केलेल्या ‘बेटी बचाओ’ या नाटिकेने उपस्थितांना सामाजिक संदेश दिला.