शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

...अन् पैशांसाठी थांबविली शस्त्रक्रिया

By admin | Updated: July 31, 2016 01:32 IST

औरंगाबाद : आॅपरेशन थिएटरमध्ये ऐनवेळी शस्त्रक्रिया थांबवून रुग्णाच्या नातेवाईकांकडे पैशांची मागणी करण्यात आल्याची घटना शहरातील डॉ. हेडगेवार रुग्णालयात घडली.

औरंगाबाद : राजीव गांधी जीवनदायी योजना मंजूर झालेली असताना आॅपरेशन थिएटरमध्ये ऐनवेळी शस्त्रक्रिया थांबवून रुग्णाच्या नातेवाईकांकडे पैशांची मागणी करण्यात आल्याची घटना शहरातील डॉ. हेडगेवार रुग्णालयात घडली. दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यासाठी ही योजना मंजूर झाली आहे. परंतु ही शस्त्रक्रिया शक्य नसल्याने ओपन सर्जरी करावी लागेल, त्यासाठी पैसे भरावे लागतील, असे रुग्णालय प्रशासनाने ऐनवेळी सांगितले. त्यामुळे शस्त्रक्रियेसाठी धावपळ करून पैशांची जुळवाजुळव करण्याची वेळ रुग्णाच्या नातेवाईकांवर आली. दिलीप सोळुंके यांच्या आई शोभा सोळुंके यांना पोटाच्या शस्त्रक्रियेसाठी पंधरा दिवसांपूर्वी डॉ. हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रिया जीवनदायी योजनेतून करण्यास मंजुरी मिळाली होती. शस्त्रक्रियेसाठी त्यांना आॅपरेशन थिएटरमध्येही नेण्यात आले. आॅपरेशन थिएटरमध्ये त्यांना नेऊन चार तास उलटले. परंतु त्यानंतर बाहेर आलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी दिलीप सोळुंके यांना शस्त्रक्रियेसाठी पैसे भरावे लागतील, असे सांगितले. जीवनदायी योजना मंजूर असताना पैशांसाठी शस्त्रक्रिया थांबल्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यामुळे ऐनवेळी पैसे कसे भरायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. त्यांनी धावपळ करून पैसे जमा केले. शस्त्रक्रिया करण्यासाठी ऐनवेळी पैसे भरण्यास सांगितल्याने या प्रकाराबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. शस्त्रक्रियेच्या परिस्थितीविषयी संपूर्ण कल्पना देण्याची आवश्यकता होती. आधीच सर्व शक्यता पडताळून पाहणे गरजेचे होते. परंतु तसे न करता पैशांसाठी शस्त्रक्रिया थांबविण्यात आली.याविषयी रुग्णालयातर्फे देण्यात आलेली माहिती अशी, सदर शस्त्रक्रिया आधी दुर्बिणीद्वारे केली जाणार होती. ही शस्त्रक्रिया जीवनदायीतून करण्यास मंजुरी मिळाली होती. परंतु ऐनवेळी दुर्बिणीऐवजी ओपन सर्जरी करावी लागणार असल्याचे लक्षात आले. ओपन सर्जरी जीवनदायीतून होत नाही. त्यामुळे हा प्रकार झाला. सर्व नियमाप्रमाणे केलेदुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करता येणार नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे अशा परिस्थितीत काय करावे, मुंबईच्या पथकाची मदत घेण्यात आली. ४यामध्ये रुग्णालयाची कोणतीही चूक नाही. ओपन सर्जरीसाठी पैसे भरणे आवश्यक होते. सर्व काही नियमानुसार केले आहे. रुग्णाच्या नातेवाईकांना संपूर्ण कल्पना दिली होती.४डॉ. सोपान कदम, एमसीओ, राजीव गांधी जीवनदायी योजना, डॉ.हेडगेवार रुग्णालय