...आणि जुळले सतरा संसार

By Admin | Updated: July 10, 2016 01:04 IST2016-07-10T00:47:10+5:302016-07-10T01:04:03+5:30

औरंगाबाद : येथील कौटुंबिक न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतमध्ये ७७.१४ टक्के प्रकरणांमध्ये तडजोड होऊन प्रकरणे निकाली निघाली.

... and matched the seventeen world | ...आणि जुळले सतरा संसार

...आणि जुळले सतरा संसार

औरंगाबाद : येथील कौटुंबिक न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतमध्ये ७७.१४ टक्के प्रकरणांमध्ये तडजोड होऊन प्रकरणे निकाली निघाली. लोकअदालतचे अनौपचारिक उद्घाटन कौटुंबिक न्यायालयाच्या प्रभारी प्रमुख न्यायाधीश अनघा जोशी यांनी केले.
कौटुंबिक न्यायालयात एकूण ५८ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. उभयपक्षाचे ३५ जोडपी सुनावणीसाठी हजर राहिले. एकूण २७ प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली. त्यापैकी १७ प्रकरणांमधील जोडपी नांदायला गेली. २२ प्रकरणांमध्ये उभय पक्षकार गैरहजर होते. आजच्या लोकअदालतमध्ये पॅनल क्रमांक १ मध्ये निवृत्तप्रमुख न्यायाधीश डी.पी. खोत यांनी प्रमुख पंच म्हणून तर विवाह समुपदेशक कुंदन जाधव आणि अ‍ॅड. जे.एस. देशपांडे यांनी पंच म्हणून काम पाहिले. तसेच पॅनल क्रमांक २ मध्ये निवृत्त न्यायाधीश के. के. गायकवाड प्रमुख पंच म्हणून तर विवाह समुपदेशक एम.एस. कदम आणि अ‍ॅड. ए. डी. करडखेडकर यांनी पंच म्हणून काम पाहिले. महालोकअदालतच्या यशस्वीतेसाठी कौटुंबिक न्यायालयातील न्यायालयीन अधीक्षिका चित्रा पाटोळे, कर्मचारी रजनी कुलकर्णी, आशा बागूल, मंगेश गव्हाणे, सुरेखा दाणी, सतीश चेडे, प्रल्हाद कुदळे आणि अमोल खोत यांनी परिश्रम घेतले.

Web Title: ... and matched the seventeen world