अनियंत्रित ट्रकने समोरून येणाऱ्या बाईकवरील दोन सख्या भावांना चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 07:53 IST2023-04-22T07:53:01+5:302023-04-22T07:53:16+5:30

सिल्लोड येथील वळण रस्त्यावर टिपू सुलतान चौकात झाला अपघात

An out-of-control truck crushed two brothers on an oncoming bike at Sillod | अनियंत्रित ट्रकने समोरून येणाऱ्या बाईकवरील दोन सख्या भावांना चिरडले

अनियंत्रित ट्रकने समोरून येणाऱ्या बाईकवरील दोन सख्या भावांना चिरडले

सिल्लोड: सिल्लोड- जळगाव रस्त्यावर टिपू सुलतान चौकात भरधाव वेगाने छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या बाईकला जोरदार धडक दिली. या अपघातात बाईकवरील दोघा भावांचा चिरडून जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी संध्याकाळी ७.१५ वाजता झाला. रुपेश ज्ञानेश्वर कळम  वय (८),  रितेश ज्ञानेश्वर कळम ( १८,दोघे रा.भवन) अशी मृत भावांची नावे आहेत.

रुपेश आणि रितेश हे दोघे भाऊ भवन येथून सिल्लोड शहरात हॉटेलचे समान घेण्यासाठी बाईकवर ( क्रमांक एमएच २० एपी ६१७३ ) येत होते.तर लोडिंग ट्रक ( क्रमांक एम एच २० इ जी ९४९५) हा जळगाव कडून छत्रपती संभाजीनगरकडे जात होता. शहरातील टिपू सुलतान चौकात वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रकने समोरून येणाऱ्या बाईकला जोराची धडक दिली. यावेळी ट्रकच्या चाकाखाली चिरडून दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला. 

माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शेषराव उदार, फौजदार बी. व्ही.झिंझुरडे, एन एस घोडे आदी कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेतली . मृतदेह सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर चालक व क्लिनर ट्रक सोडून फरार झाले आहेत.

Web Title: An out-of-control truck crushed two brothers on an oncoming bike at Sillod