जुन्या भांडणातून मफलरने गळा आवळून, विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न
By राजकुमार जोंधळे | Updated: November 30, 2022 19:40 IST2022-11-30T19:39:58+5:302022-11-30T19:40:47+5:30
हिप्परगा येथील घटनेत तिघाविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

जुन्या भांडणातून मफलरने गळा आवळून, विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न
लातूर : मागील भांडणाची कुरापत काढून एकाला मफलरने गळा आवळून, ताेंडात विषारी औषध घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना औसा तालुक्यातील हिप्परसाेगा येथे २६ नाेव्हेंबर राेजी घडली. याबाबत औसा पाेलीस ठाण्यात तिघांविराेधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी संजय रामराव पाटील (वय ५४ रा. हिप्परसाेगा) हे शेताकडे दूध काढण्यासाठी २६ नाेव्हेंबरराेजी जात हाेते. दरम्यन, निजाम नवाज शेख (वय ५०) याच्यासह अन्य दाेघांनी त्यांना हाक मारुन थांबविले. जमीन, मागील भांडणाची कुरापत काढून त्यांच्या गळ्यातील मफरलने गहा आवळून, घरासमाेरील माेकळ्या जागेत ओढून खाली पाडले. यावेळी फिर्यादीच्या छातीवर बसून जीवे मारण्याच्या उद्देशाने विषारी औषध ताेंडात घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. असे तक्रारीत म्हटले आहे. लातुरातील एका खाजगी रुग्णालयात फिर्यादीला उपचारसाठी दाखल केले आहे.
याबाबत औसा पाेलीस ठाण्यात दिलेल्या जबाबावरुन निजाम शेख याच्यासह अन्य दाेघांविराेधात गुन्हा नाेंद केला आहे. तपास पाेलीस उपनिरीक्षक गायकवाड करत आहेत.