शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत स्वच्छतेप्रश्नी मुख्याधिकाऱ्यांना घेराव

By admin | Updated: October 29, 2014 00:46 IST

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात साचलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. मंगळवारी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घालून

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात साचलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. मंगळवारी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घालून स्वच्छतेबाबत आपला संताप व्यक्त केला. यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी झंवर यांनी यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन कार्यकर्त्याला दिले.अंबाजोगाई शहरात नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाच्या गलथान कारभारामुळे शहरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. या अस्वच्छतेमुळे शहरात डेंग्यूसदृश रोगाची लागण झाल्याने अनेकजण शासकीय रुग्णालयात व खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. डेंग्यूसदृश रोगामुळे काही दिवसांपूर्वीच शहरातील दोघांचा मृत्यू झाला होता. यात एका नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याचा समावेश आहे. यासंदर्भात शहरवासीयांच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते बबन लोमटे व नगरसेवकांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना यावर उपाययोजना करण्याच्या संदर्भात निवेदन दिले होते. निवेदन देऊनही नगर परिषद प्रशासन स्वच्छतेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे मंगळवारी मुख्याधिकारी झंवर यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेराव घालून या प्रश्नी आपला संताप व्यक्त केला. यावर नगर परिषदेचे स्वच्छता विभागाचे प्रमुख उमरदंड यांनी शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी काही कालावधी देण्याची विनंती केली. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगर परिषद प्रशासनाला आठ दिवसाचा कालावधी स्वच्छतेच्या संदर्भात उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे. या आठ दिवसात नगर परिषदेच्या वतीने उपाययोजना न केल्यास आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, गिरधारीलाल भराडिया, माजी नगराध्यक्ष महादू मस्के, किशोर परदेशी, शेख रहिमभाई, नगर परिषदेचे गटनेते बबन लोमटे, डॉ. नरेंद्र काळे, सुरय्या चौधरी, दिनेश भराडिया, दिनेश लोमटे, सारंग पुजारी, अनिल पिंपळे, रऊफ बागवान, सुनिल जोगदंड, सलिम चौधरी, शेख सुजाद शेख मुसा, मंगेश देशपांडे, अनंत आरसुडे, बाला पाथरकर यांच्यासह आदिंची प्रमुख उपस्थिती होती. (वार्ताहर)