शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

सर्व शिक्षा; तरीही उपेक्षा!

By admin | Updated: June 22, 2015 00:21 IST

बीड : सर्व शिक्षा अभियानातून पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिले जातात. लाभार्थीसंख्या एक लाख ४२ हजारावर आहे;

बीड : सर्व शिक्षा अभियानातून पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिले जातात. लाभार्थीसंख्या एक लाख ४२ हजारावर आहे;परंतु अद्याप एकाही विद्यार्थ्यास गणवेश मिळालेला नाही. त्यामुळे विद्यार्थी, पालकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.मोफत पुस्तकांसोबतच गणवेश देखील दिला जातो. सर्व मुली व अनुसूचित जाती- जमाती, दारिद्र्यरेषेखालील पहिली ते आठवीचे विद्यार्थी त्यासाठी पात्र आहेत. शाळा सुरु होऊन सहा दिवस उलटले;परंतु विद्यार्थ्यांना गणवेशाचा लाभ मिळाला नाही. प्रत्येक विद्यार्थ्यास दोन गणवेश दिले जाणार आहेत. एका गणवेशासाठी २०० रुपयांची तरतूद आहे. एक लाख ४२ हजार ७७६ विद्यार्थ्यांवर प्रत्येकी ४०० रुपयांप्रमाणे पाच कोटी ७१ लाख १० हजार ४०० रुपये खर्च होत आहे.जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व मुलींची संख्या ९८ हजार ५६८ इतकी आहे. अनुसूचित जाती- जमाती, दारिद्र्यरेषेखालील पहिली ते आठवीचे विद्यार्थी ४४ हजार २०८ इतकी आहे. (प्रतिनिधी)गणवेशासाठी आवश्यक असलेल्या निधीची मागणी आम्ही आधीच केलेली होती. शुक्रवारीच पाच कोटी ३ लाख ८५ हजार एवढा निधी आलेला आहे. तो गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या खात्यावर वर्गही केला आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या नावे तो लवकरच जमा केला जाईल. त्यानंतर गणवेशाचा प्रश्न मार्गी लागेल. एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही, याची काळजी घेऊ.- सुखदेव सानप,शिक्षणाधिकारी (प्रा.)