शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

वैजापुरात अजूनही ‘हायअलर्ट’

By admin | Updated: August 4, 2016 00:38 IST

वैजापूर- नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे गोदावरी नदीपात्रात बुधवारी दुपारी सुमारे १ लाख ९३ हजार क्युसेक्सहून जास्त क्षमतेने विसर्ग सुरू आहे.

वैजापूर- नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे गोदावरी नदीपात्रात बुधवारी दुपारी सुमारे १ लाख ९३ हजार क्युसेक्सहून जास्त क्षमतेने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदामाई धोक्याच्या पातळीवरून दुधडी भरून वाहत असून, हे पाणी जायकवाडीच्या दिशेने वेगाने झेपावत आहे. धरणातून होत असलेल्या विसर्गामुळे वैजापूर तालुक्यातील गावांना संभाव्य धोका लक्षात घेऊन वैजापूरमधील ९ गावांतील मिळून २२५ कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, तर अजूनही २५० पेक्षा अधिक नागरिक सराला बेटावर अडकले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.महसूल प्रशासनाने सोमवारीच वैजापूर तालुक्यातील गोदाकाठच्या १७ गावांना अति दक्षतेचा इशारा दिलेला असतानाही काही ठिकाणी या सूचनेकडे ग्रामस्थांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने बऱ्याच ठिकाणी नागरिक अडकल्याचे वृत्त समोर येत आहे. दरम्यान, वांजरगाव येथील सराला बेट, शिंदे वस्तीला पाण्याने वेढा घातल्याने मठाधिपती रामगिरी महाराज यांच्यासह २५० पेक्षा जास्त नागरिक अडकले आहेत. यामुळे प्रशासनाची चांगलीच झोप उडाली आहे. त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी सोमवारपासून उपजिल्हाधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार सुमन मोरे, मनोहर गव्हाड हे महाराजांची मनधरणी करीत आहेत. मात्र, महाराजांनी बेट न सोडून जाण्याचे सांगितल्याने प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत. गोदावरी नदीतील पाण्यामुळे कोणत्याही गावांना पुराचा वेढा पडलेला नाही. तथापि, नदी व ओढ्यातील पाण्यामुळे पुरणगाव ते बाभूळगाव, वांजरगाव ते भालगाव आणि लाखगंगा ते बाबतारा या रस्त्यावरील वाहतूक बंद आहे. काही गावांच्या शेतजमिनीत नदीपात्राबाहेर पडलेले पाणी शिरले असून, त्यामुळे शेतपिकाचे नुकसान झाले आहे.