अजित पवार विमान अपघाताच्या अहवालात तफावत; संजय शिरसाटांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 13:45 IST2026-03-02T13:40:34+5:302026-03-02T13:45:02+5:30

महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्याच्या जाण्याने राज्याला वेदना झाल्या आहेत, त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे

Ajit Pawar plane crash report discrepancies; Sanjay Shirsat's sensational claim, demands thorough investigation | अजित पवार विमान अपघाताच्या अहवालात तफावत; संजय शिरसाटांचा खळबळजनक दावा

अजित पवार विमान अपघाताच्या अहवालात तफावत; संजय शिरसाटांचा खळबळजनक दावा

छत्रपती संभाजीनगर: "अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास करणाऱ्या दोन सरकारी कंपन्यांनी वेगवेगळी कारणे दिली आहेत, त्यामुळे या प्रकरणातील शंकेला मोठा वाव आहे. महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्याच्या जाण्याने राज्याला वेदना झाल्या आहेत, त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे," असे खळबळजनक विधान शिवसेना प्रवक्ते आ. संजय शिरसाट यांनी आज येथे केले.

विमान प्रकरणावर टीकास्त्र
जय पवार यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओवर भाष्य करताना शिरसाट म्हणाले की, "कॉकपिटमध्ये पायलट शेजारी बसून झोपणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. जर कंपनीचा मालकच असे जीवघेणे धाडस करत असेल, तर हे प्रकरण गांभीर्याने घेतले पाहिजे. अशा पायलटांवर कारवाई व्हायलाच हवी."

संजय राऊतांना 'आंतरराष्ट्रीय' टोला
संजय राऊत यांच्या आंतरराष्ट्रीय प्रश्नांवरील भाष्यावर शिरसाट यांनी सडकून टीका केली. "संजय राऊत यांना देशाच्या बॉर्डरवर नेऊन ठेवा, ते तिथे काहीतरी संदेश देतील. आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये नाक खुपसण्याची त्यांना गरज नाही, आमचे पंतप्रधान सक्षम आहेत. राऊत सध्या डोक्यावर पडल्यासारखी वक्तव्ये करत आहेत," असा टोला त्यांनी लगावला.

गणेश नाईक आणि अंतर्गत वाद
श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करणाऱ्या गणेश नाईक यांचाही शिरसाटांनी समाचार घेतला. "नाईक स्वतःचे खाते सांभाळू शकत नाहीत आणि शिंदेंना टार्गेट करत आहेत. आमच्या नादी लागलात, तर तुमच्याबद्दलची सर्व माहिती बाहेर काढू," असा इशारा त्यांनी दिला. तसेच, अमोल मिटकरींच्या विधानावर बोलताना त्यांनी मान्य केले की, पक्षात काही लोक ग्राउंड लेव्हलला 'झिरो' असतात पण विद्वत्ता दाखवण्याचा प्रयत्न करतात.

Web Title : अजित पवार के विमान दुर्घटना रिपोर्ट में विसंगतियां; शिरसाट ने जांच की मांग की।

Web Summary : संजय शिरसाट ने अजित पवार के विमान दुर्घटना रिपोर्ट में विसंगतियों का आरोप लगाया और जांच की मांग की। उन्होंने पायलट के व्यवहार और संजय राउत की अंतरराष्ट्रीय टिप्पणियों की आलोचना की, गणेश नाइक को आंतरिक विवादों के बारे में चेतावनी दी।

Web Title : Ajit Pawar's plane accident report discrepancies; Shirsaat demands thorough inquiry.

Web Summary : Sanjay Shirsat alleges discrepancies in Ajit Pawar's plane crash report, demanding investigation. He criticizes pilot behavior and Sanjay Raut's international comments, warning Ganesh Naik about internal disputes.