शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

छावणीत आचारसंहितेची ऐशीतैशी

By admin | Updated: January 6, 2015 01:12 IST

औरंगाबाद : छावणी परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारांनी आदर्श आचारसंहिता धाब्यावर बसविली आहे. निवडणूक विभागाची कोणतीही परवानगी न घेता येथे प्रचाराच्या शेकडो

औरंगाबाद : छावणी परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारांनी आदर्श आचारसंहिता धाब्यावर बसविली आहे. निवडणूक विभागाची कोणतीही परवानगी न घेता येथे प्रचाराच्या शेकडो मोठमोठ्या कमानी, होर्डिंग्ज आणि झेंडे लावण्यात आले आहेत. घराघरांवर स्टिकर्स आणि पोस्टर्स चिकटविले जात आहेत. छावणी परिषदेचे अधिकारी आणि निवडणूक विभाग मात्र, याविषयी मूग गिळून गप्प आहे. छावणी परिषदेसाठी ११ जानेवारी रोजी मतदान होत आहे. परिषदेसाठी सात वॉर्डांमध्ये यावेळी तब्बल ४६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतदानाचा दिवस जवळ आल्यामुळे आता येथील प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच उमेदवारांनी मोठमोठ्या कमानी, होर्डिंग्ज, झेंडे आणि इतर प्रचार साहित्याचा वापर केला जात आहे. आदर्श आचारसंहितेनुसार कोणत्याही उमेदवाराला निवडणूक काळात होर्डिंग्ज, कमान किंवा झेंडे लावायचे असतील तर त्यासाठी पूर्वपरवानगी घ्यावी लागते. छावणी परिषदेच्या निवडणुकीसाठी ही परवानगी देण्याचे अधिकार छावणी परिषद प्रशासनाकडे सोपविण्यात आलेले आहेत; परंतु याठिकाणी परवानगी न घेताच होर्डिंग्ज, कमानी आणि झेंडे लावले आहेत. त्यामुळे छावणीत सध्या होर्डिंग्ज युद्ध लागल्याचे चित्र आहे. सद्य:स्थिती नेहरू चौक, पटेल चौक, होलीक्रॉस चौक, लक्ष्मी कॉलनी चौक यासह अगदी गल्लीबोळांमध्ये उमेदवारांचे शेकडो होर्डिंग्ज लागलेले दिसत आहेत. एवढेच नव्हे घराघरांवर झेंडे तसेच पोस्टर्स आणि स्टिकर्स चिकटविले जात आहेत. सद्य:स्थितीत छावणीच्या हद्दीत पाचशेहून अधिक होर्डिंग्ज आणि कमानी लागलेल्या आहेत. यातील अगदी बोटावर मोजण्याइतक्याच होर्डिंग्जसाठी परवानगी घेण्यात आलेली आहे. त्यातही नेमकी किती उमेदवारांनी शुल्क भरून होर्डिंग्जची परवानगी घेतली, याची माहिती छावणी परिषद प्रशासनाकडून देण्यास टाळाटाळ केली जात आहे. परिषदेतील काही कर्मचारी यातही आर्थिक व्यवहार करीत असल्याची चर्चा आहे. रीतसर शुल्क भरून परवानगी घेण्यासाठी आलेल्या उमेदवारांना हम है ना, तुम लगालो होर्डिंग्ज, असे सांगून त्यांना परत पाठविले जात आहे. हे अभय देण्यासाठी ठराविक रक्कम घेतली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.