औरंगाबादहून १८ शहरांसाठी विमानसेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 06:12 IST2020-09-01T06:11:52+5:302020-09-01T06:12:45+5:30

कोरोनामुळे तब्बल तीन महिन्यांनी १९ जूनपासून अखेर इंडिगोने दिल्ली - औरंगाबाद - दिल्ली या हवाई मार्गावर उड्डाण सुरू केले. त्यानंतर १५ जुलैपासून इंडिगोकडून हैदराबादसाठीही विमानसेवा सुरू करण्यात आली.

Airlines from Aurangabad to 18 cities | औरंगाबादहून १८ शहरांसाठी विमानसेवा

औरंगाबादहून १८ शहरांसाठी विमानसेवा

औरंगाबाद : औरंगाबादहून मुंबई, कोलकाता, चंदिगढ यासह देशातील विविध १८ शहरांत औरंगाबादकरांना काही तासांमध्ये पोहोचणे शक्य झाले आहे. इंडिगोने दिल्ली, हैदराबादमार्गे जवळपास विविध शहरांसाठी विमानसेवा उपलब्ध करून दिली आहे.
कोरोनामुळे तब्बल तीन महिन्यांनी १९ जूनपासून अखेर इंडिगोने दिल्ली - औरंगाबाद - दिल्ली या हवाई मार्गावर उड्डाण सुरू केले. त्यानंतर १५ जुलैपासून इंडिगोकडून हैदराबादसाठीही विमानसेवा सुरू करण्यात आली. औरंगाबादहून मुंबईची विमानसेवा सुरू होण्याची आता प्रतीक्षा केली जात आहे, परंतु कनेक्टिंग विमानसेवेद्वारे हैदराबादमार्गे मुंबईला जाणे शक्य झाले आहे. केवळ मुंबईच नव्हे तर देशातील जवळपास १८ शहरांना इंडिगोने दिल्ली, हैदराबादमार्गे हवाई कनेक्टिव्हिटी दिली आहे.

Web Title: Airlines from Aurangabad to 18 cities