शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानित जमिनीचे त्रांगडे

By admin | Updated: July 10, 2014 00:56 IST

विलास भोसले, पाटोदा भूमिहिनांसह इतरांना शासनाने जमिनी दिल्या आहेत. या जमिनी मात्र प्रत्यक्ष मोजून न दिल्याने काहींनी अधिक क्षेत्रावर अतिक्रमण केले आहे

विलास भोसले, पाटोदाभूमिहिनांसह इतरांना शासनाने जमिनी दिल्या आहेत. या जमिनी मात्र प्रत्यक्ष मोजून न दिल्याने काहींनी अधिक क्षेत्रावर अतिक्रमण केले आहे, तर काहींनी अगदीच अल्प क्षेत्र आले आहे. अशा प्रकारामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये वाद होत असल्याचे चित्र सर्रास दिसून येत आहे. भूमिहीन, मागासवर्गीव व अल्पसंख्यांना यांना जमीन कसण्यासाठी देण्याचे धोरण तत्कालीन शासनाने अवलंबिले होते. जमिन नाही त्यांना कसण्यासाठी जमीन मिळावी व त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा, असा उदात्त हेतू यामागे होता. यामुळे १९९२ दरम्यान पाटोदा तालुक्यातील अनेक कुटुंबियांना गायरान व इतर शासनाच्या मालकीची जमीन दिली होती. घु.पारगाव येथे तीन गटांमध्ये जमीन आहे. देविदास साठे यांना गट क्र. ४१९ मधील १.८० हेक्टर तर इतर १९ लाभार्थ्यांना प्रत्त्येकी ०.८० हे. जमीन देण्यात आली आहे. गट क्र. १०७६ मधून ७७ कुटुंबांना प्रत्त्येकी ०.२७ हेक्टर जमीन कसण्यासाठी दिली आहे. तर, राज्य शासनाच्या सकस आहार योजनेसाठी ०.२७ हे. जमीन आहे. एकूण १०९ लाभार्थ्यांना जमीन दिली आहे.घु. पारगाव येथील लाभार्थ्यांना जमीन दिली, मात्र काही शेतकऱ्यांनी अधिक क्षेत्रावर ताबा केला. इतरांना शासन जमीन मोजून देत नसल्याने सतत वादही होत आहेत. बुधवारीही रामभाऊ साठे व सुभाष गांगुर्डे यांच्यात हमरी-तुमरी होऊन वाद झाला. प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. हे प्रकरण तडजोडीने मिटविल्याचे एएसआय कोमटवार यांनी सांगितले. असे असले तरी सतत वाद होत असल्याने लाभार्थ्यांना जमीन मोजून देण्याची मागणी होत आहे. प्रकरण पाहून कारवाई करू- वाघसामान्य कुटुंबियांची उन्नती व्हावी यासाठी शासनाने त्यांना जमिनी दिल्या आहेत. अनुदान दिलेल्या जमिनीवरून शेतकऱ्यांचे वाद असतील तर प्रत्यक्ष पाहणी करून ते वाद सोडविण्यात येतील, असे उपविभागीय अधिकारी राजेंद्र वाघ यांनी सांगितले. शेतकऱ्यांना पुन्हा जमिनी मोजून देऊ- झांपलेशासनाने शेतकऱ्यांना दिलेल्या जमिनीची सातबाऱ्यावर नोंद घेण्यात आली आहे. अनुदानित जमिनीवर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने यामुळे इतर शेतकऱ्यांवर अन्याय झाला असेल तर तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीची पुन्हा मोजणी करून देऊ, असे तहसीलदार दिनेश झांपले यांनी सांगितले.