एअर इंडियाकडून इंधन अधिभार लागू; छत्रपती संभाजीनगर-दिल्ली विमान सेवा महागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 18:11 IST2026-03-12T18:10:56+5:302026-03-12T18:11:43+5:30

विमान तिकिटांच्या दरात वाढ, इंधन दरवाढीचा फटका थेट प्रवाशांना

Air India Hikes Chhatrapati Sambhajinagar-Delhi Flight Rates; ₹399 Fuel Surcharge Applicable from Today | एअर इंडियाकडून इंधन अधिभार लागू; छत्रपती संभाजीनगर-दिल्ली विमान सेवा महागणार

एअर इंडियाकडून इंधन अधिभार लागू; छत्रपती संभाजीनगर-दिल्ली विमान सेवा महागणार

छत्रपती संभाजीनगर : एअर इंडियाचा छत्रपती संभाजीनगर-दिल्ली विमानसेवेचा प्रवास आता किमान ३९९ रुपयांनी महागणार आहे. वाढत्या जेट इंधन दरांमुळे एअर इंडियाने देशांतर्गत विमान तिकिटांवर ३९९ रुपयांचा इंधन अधिभार लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तो १२ मार्चपासून नव्या बुकिंगसाठी लागू होणार आहे.

एअर इंडियाकडून छत्रपती संभाजीनगरहून सध्या दिल्लीसाठी सकाळी आणि दुपारच्या वेळेत विमानसेवा सुरू आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर टप्प्याटप्प्याने इंधन अधिभार वाढवण्याची घोषणा केली आहे. पहिल्या टप्प्यात देशांतर्गत उड्डाणांसाठी अधिभार आकारला जाणार आहे.

विमान कंपन्यांच्या एकूण खर्चात सुमारे ४० टक्के हिस्सा जेट इंधनाचा असतो. मार्चच्या सुरुवातीपासून एव्हिएशन टर्बाइन फ्युएलच्या (एटीएफ) किमतीत मोठी वाढ झाल्याने विमान कंपन्यांवर आर्थिक ताण वाढला आहे. त्यामुळे हा अधिभार लागू करणे आवश्यक असल्याचे एअर इंडियाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, १२ मार्चपूर्वी काढलेल्या तिकिटांवर हा अधिभार लागू होणार नाही. मात्र प्रवासाची तारीख किंवा मार्ग बदलल्यास नव्या दरांनुसार तिकीट दर पुन्हा मोजावे लागू शकते.

मोठी वाढ नाही
एअर इंडियाने देशांतर्गत विमान तिकिटांवर ३९९ रुपयांचा इंधन अधिभार लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ही फार मोठी वाढ झालेली नाही.
- सुनीत कोठारी, अध्यक्ष, सिव्हिल एव्हिएशन कमिटी, ‘एटीडीएफ’

Web Title : एयर इंडिया का ईंधन अधिभार: औरंगाबाद-दिल्ली उड़ानें महंगी, 12 मार्च से लागू

Web Summary : एयर इंडिया के औरंगाबाद-दिल्ली उड़ानें 399 रुपये महंगी होंगी, 12 मार्च से ईंधन अधिभार लागू। जेट ईंधन की कीमतें बढ़ने से घरेलू और अंतर्राष्ट्रीय मार्गों पर असर। 12 मार्च से पहले बुक किए गए टिकटों पर छूट, बदलाव पर नए दर लागू।

Web Title : Air India Fuel Surcharge Hikes Aurangabad-Delhi Flights, Effective March 12

Web Summary : Air India's Aurangabad-Delhi flights will cost at least ₹399 more due to a fuel surcharge, effective March 12. The airline cites rising jet fuel prices as the reason, impacting domestic and international routes. Tickets booked before March 12 are exempt unless changes are made.