मराठा आरक्षण मागणीसाठी पैठणमध्ये बाेंबाबोंब आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 16:22 IST2020-09-21T16:20:48+5:302020-09-21T16:22:04+5:30
मराठा समाज आरक्षणासाठी पैठण शहरात सोमवार दि. २१ रोजी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मराठा समाजातील तरूण- तरूणींचा सहभागही लक्षवेधी ठरला.

मराठा आरक्षण मागणीसाठी पैठणमध्ये बाेंबाबोंब आंदोलन
औरंगाबाद : मराठा समाज आरक्षणासाठी पैठण शहरात सोमवार दि. २१ रोजी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. आरक्षणासहीत मराठा समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांना देण्यात आले आहे.
पैठण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापुतळ्या समोर पैठण तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने हजेरी लावत समाज बांधवांनी आरक्षणासंबंधीच्या तीव्र भावना व्यक्त केल्या. जवळपास दोन तास सुरू असलेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला.पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्विकारले. या आंदोलनात मराठा समाजातील तरूण- तरूणींचा सहभागही लक्षवेधी ठरला.