शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

चक्क सहा दिवसांनी कळला पाॅझिटिव्ह रुग्णाला तपासणी अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:13 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये कोरोना तपासणी केल्यावर अहवालच न कळवल्याने एक बाधित व्यक्ती सहा दिवस फिरत राहिली. ...

औरंगाबाद : महापालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये कोरोना तपासणी केल्यावर अहवालच न कळवल्याने एक बाधित व्यक्ती सहा दिवस फिरत राहिली. कंपनीत रुजूृ व्हायचं म्हणून व्यक्ती तपासणी केंद्रावर अहवाल घ्यायला गेली तेव्हा तुमचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असून तुम्ही भरती व्हा, असे त्या ग्रहस्थाला सांगितल्यावर त्यांना धक्काच बसला. दरम्यानच्या काळात सहा दिवस सुटीच्या काळात ते ग्रहस्थ मित्र परिवारासह नातेवाईकांना भेटले त्यांना तर संक्रमण झाले नसेल ना अशी चिंता त्यांना सतावू लागली, तर संपर्कात आलेल्यांचे धाबे दणाणले असृून संक्रमित तर झालो नसेल ना असा प्रश्न त्यांना सतावत आहे.

दशमेशनगर परिसरातील एक कंपनीत काम करणारे ग्रहस्थ रेल्वेस्टेशन रोड येथे २१ जानेवारीला कोरोनाच्या तपासणीसाठी गेले. अग्निशमन दल येथील तपासणी केंद्रात संध्याकाळी सातच्या सुमारात त्यांनी आरटीपीसीआर तपासणीसाठी स्वॅब दिला. त्यावेळी त्या केंद्रावरील आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांनी सांगितले. पाॅझिटीव्ह असेल तर नक्की फोन येईल. मात्र, निगेटीव्ह असल्यास फोन शक्यतो येणार नाही. दुसर्या दिवशी ते दिवसभर घरी अलगीकरणात राहीले. मात्र, अहवाल आला नाही. किंवा मनपाकडून कुठलाही निरोप न मिळाल्याने ते बिनधास्थ झाले. दरम्यान ते मित्र, नातेवाईक कुटुंबियांच्या संपर्कात आले. बुधवारी सकाळी त्यांना खोकला यायला लागला. त्यामुळे लक्षणे दिसु लागल्याने त्यांनी तपासणी केली असल्याने रिपोर्ट घेवून डाॅक्टरांकडे जाण्यासाठई घरुन निघाले. मात्र, आरोग्य केंद्रावर त्यांचे नाव तपासल्यावर ते पाॅझीटीव्ह असल्याचे सांगून त्यांना अग्निशमन दलाच्या काॅरंटाईन सेंटर मध्ये भरती केल्या गेले. असे त्या बाधित रुग्णाने सांगितले. तांत्रिक अडचणीत किंवा मनपाचे कर्मचारी अहवाल सांगण्याचे विसरुन गेले असतील. त्यामुळे काही हरकत नसुन इथे आवश्यक सोयीसुविधा असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले. मात्र, अगोदर रिपोर्ट कळाला असता तर इतरांच्या संपर्कात जाणे टाळता आले असते असे ते म्हणाले.

बाधिताच्या संपर्कातील चिंतेत

तपासणी केल्याच्या दुसर्या दिवसापासून म्हणजे २३ ते २६ जानेवारी दरम्यान शासकीय दोन सुट्या मिळाल्या होत्या. त्यात कर्मचारी अनेकांच्या संपर्कात आल्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच ज्यांच्या संपर्कात ते बाधित आले. त्यांनी मात्र, कोरोनाचे संक्रमण झाले तर ना या बद्दल भिती व्यक्त केली. सध्या एकीककडे साथ आटोक्यात येत असतांना असे प्रसंग पुन्हा घडू नये यासाठी काळजी घ्यावी व काहीशी ढिली पडलेल्या यंत्रणेला पुन्हा सतर्क करुन गांभिर्य पटवून देण्याची मागणी त्या नातेवाईकांनी केली.