शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

‘हरित फुप्फुसे’ वाचवण्याची लढाई! गरवारे स्टेडियममधील ७५ झाडे तोंडीविरोधात जनहित याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 19:59 IST

झाडे वाचवण्यासाठी नागरिकांची न्यायालयीन लढाई.

छत्रपती संभाजीनगर : ‘इंटरनॅशनल स्टेडियम’च्या नावाखाली छत्रपती संभाजीनगरमधील गरवारे स्टेडियम परिसरातील पूर्ण वाढ झालेल्या सुमारे ७५ झाडांच्या प्रस्तावित तोडीविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने प्रतिवादींना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. या प्रतिवादींना २ आठवड्यांत नोटीसला उत्तर द्यावे लागणार आहे.

खंडपीठाने केंद्र व राज्य शासन, राज्याचे पर्यावरण, वन आणि हवामान बदलविभागाचे आणि नागरी विकास विभागाचे प्रधान सचिव, छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त, उद्यान विभागाचे संचालक आणि एमआयडीसी यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला असून, एमआयडीसीला प्रतिवादी करण्याचे निर्देश याचिकाकर्त्यांना दिले आहेत.

काय आहे याचिका?ही याचिका ‘गरवारे हरित पट्टा बचाव समिती’च्यावतीने शिरीष कुलकर्णी व इतर यांनी दाखल केली आहे. याचिकेनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील गरवारे स्टेडियममध्ये ‘साउथ पॅव्हेलियन’ उभारण्यासाठी ३० ते ४० वर्षे जुनी सुमारे ७५ झाडे तोडण्याचा प्रस्ताव असून, ५ फेब्रुवारी रोजी जाहिरात प्रसिद्ध करुन आक्षेप मागविले. मात्र, यासाठी कोणतीही सार्वजनिक सुनावणी घेण्यात आलेली नाही तसेच पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास किंवा पर्यायी उपाययोजना विचारात घेतलेली नाही. याचिकेत पर्यावरणीय हानीचा आरोप करण्यात आला आहे. वृक्षतोडीचा प्रस्ताव बेकायदेशीर व पर्यावरणविरोधी असल्याचा आरोप याचिकेत केला आहे. प्रस्तावित वृक्षतोडीला ७ व ९ फेब्रुवारीला १०० पेक्षा अधिक नागरिकांनी हरकती नोंदवल्या आहेत. ‘इंटरनॅशनल स्टेडियम’च्या दाव्याला पुरावा नाही. पर्यावरणीय कायद्यांचे उल्लंघन झाल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. संकेत कुलकर्णी काम पाहत आहेत.

‘हरित फुप्फुसे’ वाचवण्याची लढाईगरवारे स्टेडियम परिसर हा शहरातील महत्त्वाची ‘हरित फुप्फुसे’ (ग्रीन लंगस्) असून, येथे असलेली झाडे ऑक्सिजन, सावली आणि प्रदूषण नियंत्रणासाठी अत्यंत आवश्यक आहेत. वृक्षतोड झाल्यास स्थानिक पर्यावरण व नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होणार असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Fight to save 'green lungs': Petition against tree felling.

Web Summary : Petition filed against cutting 75 trees at Garware Stadium for a stadium. Aurangabad High Court issued notices to respondents. Petitioners argue the felling lacks public hearing and environmental impact assessment, harming the city's 'green lungs'.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरenvironmentपर्यावरणAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ