शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

रूई-कल्हाळी रस्त्याचे काम उद्घाटनानंतर ठप्पच

By admin | Updated: April 18, 2016 00:42 IST

नांदेड : कंधार तालुक्यातील रूई- कल्हाळी या रस्त्याचे काम उद्घाटनानंतर अद्याप सुरूच झाले नसून कामाअभावी कंधार तालुक्यातील अनेक मजुरांनी गावे सोडली आहेत़

नांदेड : कंधार तालुक्यातील रूई- कल्हाळी या रस्त्याचे काम उद्घाटनानंतर अद्याप सुरूच झाले नसून कामाअभावी कंधार तालुक्यातील अनेक मजुरांनी गावे सोडली आहेत़ रोहयोची कामे मागणी करूनही सुरू झाली नसून इ- मस्टरही दिले जात नाही़ जिल्ह्यातील सेवाभावी संस्थांनी केलेल्या पाहणीत दुष्काळी परिस्थितीतही प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे़ मराठवाडा जनता विकास परिषद आणि परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने कंधार तालुक्यातील, पानभोसी, बहाद्दरपुरा, फुलवळ, कळका, कल्लाळी आदी गावांमध्ये भेटी देवून माहिती घेण्यात आली़ उपरोक्त गावात मजुरांच्या मागणीनंतरही मनरेगांची कामे सुरू झाली नाहीत़ अंबुलगा येथील नाला खोलीकरणाचे कामही थातूरमातूर करण्यात आले आहे़ त्याचवेळी अर्धवट केटीवेअरच्या कामामुळे दलित वस्तीत पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे़ त्यामुळे हे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी उपविभागीय अधिकारी अश्विनी पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे़ मन्याड नदीत बहाद्दरपुऱ्याजवळ बंधारा उभारण्याची तसेच कंधार येथील जगतुंग समुद्रातील काळ काढून पाणीप्रश्न सोडविता येवू शकतो, असेही स्पष्ट करण्यात आले़ बारूळ धरणातही मृत जलसाठाच शिल्लक असल्याने पाणीप्रश्न गंभीर झाला आहे़ कल्लाळीतील परिस्थितीबाबतही संस्थांनी चिंता व्यक्त केली असून हैदराबाद मुक्तिसंग्रामात २५ हुतात्मे या गावचे झाले आहेत़ तेथे असलेल्या स्मारकाची दुरवस्था झाली आहे़ प्रशासनाने याबाबीची गंभीर दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे़ या दुष्काळदौऱ्यात माजी खा़ व्यंकटेश काब्दे, प्रा़ नाना शिंदे, भगीरथ शुक्ला, डॉ. किरण चिद्रावार, सूर्यकांत वाणी, बळवंत मोरे, एऩ जी़ पटणे, भाऊ मोरे, दिगांबर पेटकर आदींची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)