शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पातील पाणी उपशाकडे प्रशासनाची डोळेझाक

By admin | Updated: July 5, 2014 23:47 IST

राम तत्तापुरे , अहमदपूर अहमदपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या थोडगा, लिंबोटी व अंधोरी प्रकल्पातून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरू केला आहे़

बंड शमले : प्रदेशाध्यक्षांच्या आश्रयाला यवतमाळ : आमदार किंवा त्यांच्या पूत्राला विधानसभेचे तिकीट देऊ नका, अशी जाहीर भूमिका घेऊन बंडाचे निशाण फडकाविणाऱ्या काँग्रेसमधील असंतुष्ट पदाधिकाऱ्यांनी अवघ्या आठवडाभरातच ‘नांग्या’ टाकल्या. काँग्रेसमधील दुसऱ्या फळीच्या या नेत्यांनी शनिवारी प्रदेशाध्यक्षांच्या आश्रयाला जात नमते घेतले. दोन आठवड्यांपूर्वी जिल्हा काँग्रेसमधील दुसऱ्या फळीच्या नेत्यांनी अचानक आक्रमक भूमिका घेतली. स्वतंत्र बैठकीनंतर पत्रपरिषद घेऊन आमदार व त्यांच्या पूत्रांच्या आगामी विधानसभेतील उमेदवारीला विरोध दर्शवित काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार वामनराव कासावार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानुसार दुसऱ्याच दिवशी कासावारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर या असंतुष्ट नेत्यांमध्ये फूट पडली. यातील काही नेत्यांनी पुन्हा श्रीकृष्णनगरात बैठक घेऊन ६ जुलै रोजी सोनिया गांधींच्या दिल्ली भेटीचा मुहूर्त ठरविला. हे पदाधिकारी ठरल्या प्रमाणे दिल्लीला रवाना झाले असतील असा सर्वांचाच अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात या नेत्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांच्या बंगल्यावर आश्रय घेऊन नांग्या टाकल्या. शनिवारी माणिकरावांनी या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन समजूत काढली आणि हे पदाधिकारी अवघ्या काही क्षणातच सर्वकाही समजलेसुद्धा!दिल्लीवारी रोखलीदुसऱ्या फळीच्या या नेत्यांची प्रदेशाध्यक्षांनी ६ जुलैची दिल्लीवारी रोखली. त्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेतल्यानंतर ‘तुमच्या तक्रारीत तथ्य आहे’ अशी पावतीही लगेच फाडून दिली. जिल्ह्यातील पक्षाच्या सर्व आमदारांची लवकरच बैठक बोलविली जाईल. त्यांना समज दिली जाईल, त्यांच्याही अडचणी ऐकून घेतल्या जातील, असे ठाकरे यांनी या पदाधिकाऱ्यांना सांगितले. अनेक ठिकाणी प्रशासनामुळे काँग्रेस हरल्याच्या बाबीला त्यांनी दुजोरा दिल्याचे सांगण्यात आले. ‘रॉयल्टी’वर अधिकारी आणण्याच्या पद्धतीला या पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला. (जिल्हा प्रतिनिधी)