'लोकांच्या जीवाची यांना पर्वा नाही, गांभीर्य नाही'; आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 13:51 IST2023-10-03T13:51:22+5:302023-10-03T13:51:44+5:30
शासकीय रुग्णालयातील या घटनेवरुन राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

'लोकांच्या जीवाची यांना पर्वा नाही, गांभीर्य नाही'; आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर घणाघात
नांदेडमधील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार घेणारे आणखी ४ नवजातांसह एकूण ७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मागील ४८ तासात एकूण मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या आता ३१ झाली आहे. यात ४ नवजात बालक, ३ प्रौढ यांचा समावेश आहे. त्या अगोदरच्या २४ तासात २४ जणाचा मृत्यू झाल्याने अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. आता एकूण मृत्यूंची संख्या आता ३१ वर पोहोचली आहे. तर छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात दोन बालकांसह ८ जणांचा मृत्यू झाला आहे.
शासकीय रुग्णालयातील या घटनेवरुन राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी देखील ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. कालच नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचं थैमान झाल्याची भीषण धटना घडली असताना, आज तसाच भयानक प्रकार छत्रपती संभाजीनगरमधल्या घाटी रुग्णालयात घडल्याचं समोर येतंय. २ बालकांसह ८ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नांदेडच्या रुग्णालयातही अजून ७ मृत्यू झाल्याचं समजतंय. हे सगळं भयानक आहे, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
शासकीय रुग्णालय हा मृत्यूचा सापळा बनलाय का? अशी शंकाही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केली आहे. महाराष्ट्रातली आरोग्य व्यवस्था ह्या भ्रष्ट मिंधे-भाजपा सरकारच्या काळात कोलमडून गेल्याचं ढळढळीतपणे दिसतंय. लोकांच्या जीवाची ह्यांना पर्वा नाही, परिस्थितीचं गांभीर्य नाही... अश्यांना सत्तेच्या खुर्चीत बसून महाराष्ट्र सांभाळण्याचा हक्कच नाही, असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला आहे.
कालच नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचं थैमान झाल्याची भीषण धटना घडली असताना, आज तसाच भयानक प्रकार छत्रपती संभाजीनगर मधल्या घाटी रुग्णालयात घडल्याचं समोर येतंय. २ बालकांसह ८ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नांदेडच्या रुग्णालयातही अजून ७ मृत्यू झाल्याचं समजतंय. हे…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 3, 2023
चौकशी समिती आज नांदेडमध्ये-
सदर घडलेल्या प्रकारानंतर चौकशी समिती आज नांदेडमध्ये येणार आहे. शासकीय रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेतली असून मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातील डॉ. भारत चव्हाण, डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. जोशी या तिघांची चौकशी समिती नांदेडात येणार आहे.