शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
5
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
6
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
7
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
8
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
9
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
10
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
11
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
12
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
13
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
14
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
15
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
16
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त सेविकेमुळे अंगणवाडी होणार सक्षम

By admin | Updated: August 24, 2014 23:54 IST

भिकाजी कीर्तनकार, नर्सी नामदेव ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रांमध्ये नव्याने अतिरिक्त सेविका पदाची भरती केली जाणार आहे.

भिकाजी कीर्तनकार, नर्सी नामदेवग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रांमध्ये नव्याने अतिरिक्त सेविका पदाची भरती केली जाणार आहे. त्यासाठी पात्रतेच्या अटी पूर्ण करणाऱ्या महिलेची या पदावर नियुक्ती करण्यात येणार असल्याचे पत्रक सर्व गावांमध्ये पाठविण्यात आले आहे. हिंगोली तालुक्यात १६८ अंगणवाडी केंद्र स्थापन करण्यात आलेले आहेत. १६८ ठिकाणी कार्यकर्ती काम करीत आहेत. त्यांना साह्य करण्याच्या दृष्टीने व त्यांच्या सुविधा व आरोग्याची काळजी घेणे, कार्यालयीन कामे करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून एका अंगणवाडीच्या ठिकाणी अतिरिक्त सेविका म्हणून सर्वच ठिकाणी आणखी एक पद भरण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे येथील महिला बालकल्याण व बालविकासाच्या आयुक्तांनी १२ आॅगस्ट रोजी हिंगोली जिल्हा कार्यालयास पत्र पाठवून अतिरिक्त पदांची भरती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार हिंगोली तालुक्यात १६८, वसमत २०३, कळमनुरी ८९, आखाडा बाळापूर १२४, सेनगाव १९९, औंढा १८० अशी एकूण १६३ पदे लवकरच भरण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. गावांमध्ये पाठविण्यात आलेल्या पत्रकांवर जि.प.च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण विभाग) यांची स्वाक्षरी आहे. या पदाच्या निवडीसाठी किमान दहावी उत्तीर्ण असलेली त्याच गावची रहिवासी महिला पात्र ठरणार असून तिच वय २९ ते ३० वर्षे असायला हवे. शिवाय दोन अपत्यापेक्षा जास्त मुले नसल्याचे प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. ग्रामीण भागातील अतिरिक्त सेविका (दुसरी कार्यकर्ती) मुळे अंगणवाड्यांचे सक्षमीकरण होणार आहे.