शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

११०० बेशिस्त चालकावर गंडातर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 23:53 IST

वारंवार कारवाई करूनही सिग्नल तोडणे, दारू पिऊन गाडी चालविण्यासारखे वाहतूक नियमांची ऐसीतैशी करणा-या अकराशे वाहनचालकांचे लायसन्स लवकरच रद्द होणार आहे.

बापू सोळुंके ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वारंवार कारवाई करूनही सिग्नल तोडणे, दारू पिऊन गाडी चालविण्यासारखे वाहतूक नियमांची ऐसीतैशी करणा-या अकराशे वाहनचालकांचे लायसन्स लवकरच रद्द होणार आहे. याबाबत शिफारस शहर वाहतूक विभागाच्या सहायक पोलीस आयुक्तांनी आरटीओकडे केली आहे. यापैकी ४५ जणांचे लायसन्स निलंबित करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. बेशिस्त वाहनचालकांमुळे शहरात रोज लहान-मोठे अपघात होतात. एवढेच नव्हे, तर जालना रोडसारख्या महत्त्वाच्या मार्गांवर आणि चौकात वाहतूक कोंडी होत असते. सिग्नल तोडून वाहन पळविणे, अवैध प्रवासी वाहतूक करणे, चौकात रिक्षा उभ्या करणे, विना हेल्मेट दुचाकीस्वार, विना सीटबेल्ट कार चालविणे, राँग साइड वाहने पळविणाºयांविरुद्ध वाहतूक शाखेच्या वतीने रोज कारवाई केली जाते.या कारवाईचा कोणताही परिणाम वाहनचालकांवर होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी वारंवार नियम मोडणा-या वाहनचालकांचे लायसन्स रद्द करण्याची शिफारस आरटीओकडे करण्याचे आदेश सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) सी.डी. शेवगण यांना दिले.आदेश मिळताच एसीपी शेवगण यांनी शहर, सिडको, छावणी आणि वाळूज वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या १५ पोलीस अधिकारी आणि ३०० पोलिसांना कारवाईचे आदेश दिले.वारंवार सिग्नल तोडून पळणा-या दुचाकीचालकांना पकडल्यानंतर त्यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईचा डेटा त्यांनी तयार केला.या डेटानुसार एखाद्या वाहनचालकास वाहतूक नियम मोडताना किती वेळा पकडण्यात आले, याबाबतची सर्व माहिती अधिका-यांना प्राप्त झाली. पंधरा दिवसांमध्ये तीनपेक्षा अधिक वेळा वाहतूक नियम मोडून वाहन चालविणा-या अकराशे वाहनचालकांचे लायसन्स रद्द करण्याची शिफारस आरटीओकडे नुकतीच करण्यात आली.या शिफारसीची अमंलबजावणीही आरटीओ कार्यालयाकडून करण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती एसीपी शेवगण यांनी दिली. ते म्हणाले की, चौकात थांबणा-या रिक्षाचालकांवर माझ्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी सतत कारवाई करतात. यासोबतच वाहतूक नियम मोडणा-या अन्य वाहनचालकांविरुद्ध आम्ही दंडात्मक कारवाई करीतच असतो.