औरंगाबादमध्ये 'एसीपी'वर विनयभंगाचा गुन्हा, ड्युटीवर असताना घरात घुसून महिलेची छेडछाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2023 11:45 IST2023-01-15T11:39:29+5:302023-01-15T11:45:49+5:30

एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

ACP charged with molestation in Aurangabad, woman molested by entering house while on duty | औरंगाबादमध्ये 'एसीपी'वर विनयभंगाचा गुन्हा, ड्युटीवर असताना घरात घुसून महिलेची छेडछाड

औरंगाबादमध्ये 'एसीपी'वर विनयभंगाचा गुन्हा, ड्युटीवर असताना घरात घुसून महिलेची छेडछाड

औरंगाबाद : नाईट ड्युटीवर असताना एसीपी पदावरील पोलीस अधिकाऱ्याने रात्री २ वाजेच्या सुमारास घरात घुसून महिलेची छेडछाड केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल ढुमे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधिकारी एसीपी विशाल ढुमे रात्री एका हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी गेले असताना त्यांची भेट मित्रासोबत झाली. यावेळी मित्रासोबत त्याची बायको देखील होती. दरम्यान, तेथून निघताना ढुमे यांनी माझ्याकडे गाडी नाही लिफ्ट मिळेल का? अशी विनंती केल्याने मित्राने त्यांना आपल्या गाडीत बसवले. मात्र, पाठीमागील सीटवर बसलेल्या ढुमे यांनी समोरील सीटवर बसलेल्या मित्राच्या पत्नीची गाडीतच छेड काढणे सुरू केले. काही वेळाने मला मला वॉशरूमला जायचे असून, तुमच्या घरी घेऊन चला अशी विनंती केली. 

मित्राच्या घरी पोहचल्यावर तुमच्या बेडरूम मधला वॉशरूम वापरू द्या असे म्हणत तिथेही मित्राच्या पत्नीसोबत छेडछाड केली. तसेच मित्राला मारहाण केली असा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: ACP charged with molestation in Aurangabad, woman molested by entering house while on duty