शासनाच्या आर्थिक नुकसानीचा ठपका; ग्रामीणचे तहसीलदार रमेश मुंडलोड यांचे निलंबन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 12:56 IST2025-06-27T12:56:02+5:302025-06-27T12:56:47+5:30

अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडून अहवाल आल्यानंतर निलंबन

Accused of causing financial loss to the government; Suspension of Rural Tehsildar Ramesh Mundlod | शासनाच्या आर्थिक नुकसानीचा ठपका; ग्रामीणचे तहसीलदार रमेश मुंडलोड यांचे निलंबन

शासनाच्या आर्थिक नुकसानीचा ठपका; ग्रामीणचे तहसीलदार रमेश मुंडलोड यांचे निलंबन

छत्रपती संभाजीनगर : शासनाचे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका ठेवून तत्कालीन अपर तहसीलदार रमेश मुंडलोड यांचे गुरुवारी रात्री निलंबन केल्याचा आदेश शासनाने जारी केला.

जुलै २०२४ आडगाव बुद्रुक व गांधेली येथील देवस्थानच्या १८० एकर इनामी जमिनीस कूळ कायदा लागू होत नसताना त्यांनी ती बेकायदेशीररीत्या खाजगी लोकांच्या नावावर केली होती. त्यामुळे त्यांची अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या समितीकडून चौकशी सुरू होती. या समितीचा अहवाल आल्यावर महसूल विभागाचे अवर सचिव प्रवीण पाटील यांनी रात्री उशिरा त्यांच्या निलंबनाचा आदेश काढला.

दरम्यान, मुंडलोड यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, ‘विभागीय चौकशी आणि निलंबन, अशा दोन्ही प्रक्रिया एकदाच करता येत नाहीत, या प्रकरणात मॅटमध्ये दाद मागेन.’

Web Title: Accused of causing financial loss to the government; Suspension of Rural Tehsildar Ramesh Mundlod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.