शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: निकालानंतर तामिळनाडूत राजकीय भूकंप, AIDMK पक्षात मोठी फूट पडणार?
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
5
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
6
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
7
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
8
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
9
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
10
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
11
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
12
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
13
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
14
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
15
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
16
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
17
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
18
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील अपघातास प्रशासनच जबाबदार!

By admin | Updated: June 9, 2014 00:06 IST

सोमनाथ खताळ , बीड शहरातील वाढते अतिक्रमण पुन्हा एकदा बीडकरांच्या अपघातास निमंत्रण देत आहे़

सोमनाथ खताळ , बीड शहरातील वाढते अतिक्रमण पुन्हा एकदा बीडकरांच्या अपघातास निमंत्रण देत आहे़ शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापुर या राष्ट्रीय महामार्गाने पोलिस कर्मचाऱ्यापासून विद्यार्थी, पादचारी यांचा जीव घेतला आहे़ केवळ अपघातानंतर हे अतिक्रमण हटवून बीडकरांची समजूत काढण्याचे काम प्रशासन करीत आहे़ महामार्गावर पुन्हा अतिक्रमणे थाटल्याने यापुढे होणाऱ्या अपघातास जबाबदार कोण? असा प्रश्न नक्कीच उपस्थित होईल आणि या प्रश्नाचे उत्तर असेल ते म्हणजे प्रशासनच! ‘लोकमत’ ने रविवारी शहरातून जाणाऱ्या महामार्गाची पाहणी केली असता, महामार्गावर अतिक्रमणे, अवैध वाहतूक, हातगाडे, वाहनांची पार्किंग सर्रास केली जात आहे़शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाने अनेक बळी घेतले आहेत़ आगोदरच बीड शहराला बायपास आणि उड्डाणपुल नसल्याने शहरातून अवजड वाहनांची वाहतूक असते़ या मोठ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीही होते़ वाहतूक कोंडी मोकळी करताना वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या नाकीनऊ येते़ काही महिन्यापूर्वीच शिक्षकासह मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या तरूणाला भरधाव ट्रकने चिरडले होते़ याचे तीव्र पडसाद अपघातानंतर अवघ्या काही तासातच बीड शहरात उमटले़ अनेकांनी मोर्चे काढले, नेत्यांचे पुतळे जाळले, पे्रत यात्रा काढल्या यासरखे अनेक कुटाने केले़ याची दखलही घेण्यात आली आणि दुपारनंतर महामार्गावरील अतिक्रमणे पोलिस बंदोबस्तात हटविण्यात आले़ त्यांनतर अवघा महिनाभरच महामार्गाने मोकळा श्वास घेतला़ मात्र नंतर पुन्हा अतिक्रमणे थाटण्यास सुरूवात झाली़ याकडे ना प्रशासनाचे लक्ष आहे, ना अपघात झाल्यानंतर मोर्चे, आंदोलन, निदर्शने करणाऱ्या साामाजिक, राजकीय संघटनांचे़ यावरून एवढेच दिसून येत आहे की, प्रशासन बीडकरांचा राग शांत करण्यासाठी तात्पुरती समजूत काढत आहे़साठे चौक, शिवाजी चौक, नगर नाका या वर्दळीच्या भागात अवैध वाहतूक करणारे वाहने वाहतूकीस अडथळा निर्माण करीत आहेत़ याकडे मात्र संबंधीत विभाग जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा अरोप नागरिकांमधून केला जात आहे़याबाबत ऩप़चे मुख्याधिकारी व्ही़बी़ निलावाड म्हणाले, हे अतिक्रमण हटवुन अतिक्रमणधारकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील़