शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

स्वीकृत सदस्यांच्या निवडीस आव्हान देणाऱ्या याचिका निकाली

By admin | Updated: July 22, 2016 00:46 IST

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेच्या पाच स्वीकृत सदस्यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या तिन्ही याचिका औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. के. के. सोनवणे यांनी निकाली काढल्या.

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेच्या पाच स्वीकृत सदस्यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या तिन्ही याचिका औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. के. के. सोनवणे यांनी निकाली काढल्या. याचिकाकर्त्यांना निवडणूक याचिके चा पर्याय उपलब्ध असल्याने खंडपीठाने वरील याचिका निकाली काढल्या. याचिकाकर्त्यांना निवडणूक याचिका अथवा इतर कायदेशीर कार्यवाही करण्याची मुभा राहील, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर पाच स्वीकृत सदस्यांची निवड प्रक्रिया २० मे २०१५ रोजी सुरू झाली. नामनिर्देशनपत्र स्वीकारल्यावर महापालिका आयुक्तांच्या शिफारशीनंतर ३० मे रोजी पाच स्वीकृत सदस्यांची निवड झाली. मात्र, पालिका नियमांचे उल्लंघन करून अपात्र उमेदवारांची निवड झाल्याने ही निवड रद्द करावी, अशी विनंती करणाऱ्या याचिका राजेंद्र दाते पाटील, डॉ. आशा बिनवडे, लतिका नरवडे यांनी दाखल करून स्वीकृत सदस्य कचरू घोडके, बंटी तनवाणी, सुनीता आऊलवार, चेतन कांबळे व अ‍ॅड. एटीएके शेख यांच्या निवडीला आव्हान दिले होते. स्वीकृत सदस्यांची निवड करताना सर्वसाधारण सभेमध्ये कायद्याने विहित केलेल्या पद्धतींचे व नियमांचे पालन केलेले नाही. अनेक उमेदवारांनी अपूर्ण नामनिर्देशनपत्र दाखल केलेले असल्याचा शेरा आयुक्तांनी नोंदविलेला आहे. प्रत्येक प्रवर्गातून एका उमेदवाराची निवड न करता एकाच प्रवर्गातून सर्वांची नियुक्ती करणे ही बाब बेकायदेशीर असल्याने ती रद्द ठरवावी व नव्याने स्वीकृत सदस्य निवडण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती याचिकांमध्ये केली होती. गुरुवारी याचिकाकर्त्यांना निवडणूक याचिका दाखल करण्याचा पर्यायी मार्ग उपलब्ध असल्याने तिन्ही याचिका निकाली काढल्या. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. मधुर गोलेगावकर, अ‍ॅड. संतोष जाधवर यांनी, सदस्यांतर्फे अ‍ॅड. प्रदीप देशमुख, अ‍ॅड. देवदत्त पालोदकर, अ‍ॅड. राजेंद्र देशमुख आणि महापालिकेतर्फे अ‍ॅड. अतुल कराड यांनी काम पाहिले.