शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत ३०० खाटांचे स्त्री रुग्णालय मंजूर

By admin | Updated: August 24, 2014 00:33 IST

परभणी :येथे स्वतंत्र स्त्री रुग्णालयासंदर्भात सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले असून, ३०० खाटांचे स्त्री रुग्णालय शहरासाठी मंजूर झाले आहे़

परभणी :जिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत असल्याने परभणी येथे स्वतंत्र स्त्री रुग्णालयाची आवश्यकता होती़ गेल्या तीन वर्षांपासून या संदर्भात सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले असून, ३०० खाटांचे स्त्री रुग्णालय शहरासाठी मंजूर झाले आहे़ परभणी हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी परिसरातील मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात़ या रुग्णालयात चांगल्या सुविधा उपलब्ध असल्या तरी वाढणारी रुग्णांची संख्या लक्षात घेता स्वतंत्र स्त्री रुग्णालय असावे, अशी शहरवासियांची अपेक्षा होती़ त्यानुसार गेल्या तीन वर्षांपासून या अनुषंगाने हालचाली सुरू झाल्या़ परभणी शहरातील शनिवार बाजार भागात यापूर्वी स्त्री रुग्णालय होणार होते़; परंतु, या रुग्णालयासंदर्भात तांत्रिक अडचणी उपस्थित झाल्याने या रुग्णालयाकरीता निश्चित केलेल्या इमारतीमध्ये नेत्र रुग्णालय उभारण्यात आले आहे़ या पार्श्वभूमीवर परभणी शहराकरीता आता दर्गारोड भागात कृत्रिम रेतन केंद्र परिसरात स्त्री रुग्णालय उभारण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे़ ३०० खाटांचे हे रुग्णालय राहणार असून, यासाठी २़५ एकर जागा आरोग्य विभागाला पशूसंवर्धन विभागाकडून हस्तांतरित करण्यात आली आहे़ अत्याधुनिक स्त्री रुग्णालय उभारण्याकरीता २५ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता लागणार असून, पहिल्याच टप्प्यात ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे़ महाराष्ट्रातील आरोग्य विभागांतर्गत अत्याधुनिक सुविधा असणारे हे एकमेव स्त्री रुग्णालय असणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली़ या स्त्री रुग्णालयाच्या इमारतीचे भूमीपूजन २४ आॅगस्ट रोजी आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान यांच्या हस्ते होणार आहे़ (जिल्हा प्रतिनिधी)