गर्भवती राहिल्यानंतरही मित्राकडून अत्याचार, गर्भपातानंतर लग्नासाठी केली २ कोटींची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 12:43 IST2024-10-05T12:43:32+5:302024-10-05T12:43:44+5:30

मित्राविरोधात तरुणीची तक्रार, मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Abuse by friend even after pregnancy, demand of 2 crores for marriage after abortion | गर्भवती राहिल्यानंतरही मित्राकडून अत्याचार, गर्भपातानंतर लग्नासाठी केली २ कोटींची मागणी

गर्भवती राहिल्यानंतरही मित्राकडून अत्याचार, गर्भपातानंतर लग्नासाठी केली २ कोटींची मागणी

छत्रपती संभाजीनगर : पूर्वाश्रमीच्या प्रियकराच्या मित्राने लग्नाचे आमिष दाखवून गोवा, मनाली, इगतपुरी, दिल्ली, मुंबईच्या अलिशान हॉटेलमध्ये नेत अत्याचार केले. मोबाइलमध्ये त्याचे चित्रण करून बांधकाम व्यावसायिक महिलेला ब्लॅकमेल केले. यातून ती गर्भवती असताना अत्याचार करून लग्न करण्यासाठी २ कोटी रुपयांची मागणी केली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अभिषेक संजीव गुप्ता (रा. गारखेडा) याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३० वर्षीय तरुणीची बांधकाम कंपनी आहे. काही महिन्यांपूर्वी पूर्वाश्रमीच्या प्रियकराने फसवणूक करून अत्याचार केल्याप्रकरणी तिने मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्याच प्रियकराचा अभिषेक मित्र आहे. प्रियकरावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पतीने साथ साेडल्याने अभिषेकने तरुणीला मदत केली होती. मात्र, त्याकडे तरुणीची आक्षेपार्ह छायाचित्र, व्हिडीओ होते. नोव्हेंबर २०२२ मध्ये त्याने ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर सातत्याने दिल्ली, मुंबई, मनाली, मुंबईतील नामांकित हॉटेलमध्ये नेऊन वारंवार अनैसर्गिक अत्याचार केले. त्याचे चित्रिकरण करून तो तरुणीला पाठवून धमकावत होता. भावनिक कारण करून त्याने माझ्याकडून २५ लाख रुपये घेतल्याचा आरोपही तरुणीने तक्रारीत केला आहे.

तरुणाच्या घरात झाला हाेता वाद
काही महिन्यांपूर्वी तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तिने लग्नासाठी तगादा लावला. अभिषेकने टाळाटाळ केली. ऑगस्ट महिन्यात तरुणी चार महिन्यांची गर्भवती असताना अभिषेकने तिच्यावर अत्याचार केले. परिणामी, तरुणीचा गर्भपात झाला. १५ सप्टेंबर रोजी तरुणीने त्याचे गारखेड्यातील घर गाठले. तेथे त्याच्या कुटुंबासोबत वाद झाल्याने तिने पोलिसांना बोलावून घेतले. अभिषेकच्या कुटुंबानेही तरुणीविरोधात पोलिस ठाण्यामध्ये गंभीर आरोपांच्या तक्रारी केल्या आहेत. त्यानंतर तरुणीने मुकुंदवाडी ठाण्यात अत्याचाराची तक्रार दिली. उपनिरीक्षक संजय राऊत अधिक तपास करत आहेत.

Web Title: Abuse by friend even after pregnancy, demand of 2 crores for marriage after abortion