शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

अभिषेक मेथेकर ‘लोकमत’ ‘हवाई सफर’ चा मानकरी

By admin | Updated: July 3, 2014 00:23 IST

हिंगोली : ‘लोकमत’ च्या वतीने गेल्या शैक्षणिक वर्षांत ‘संस्काराचे मोती’ या उपक्रमांतर्गत ‘हवाई सफर’ स्पर्धेत हिंगोलीतील अभिषेक संजय मेथेकर हा मानकरी ठरला आहे.

हिंगोली : ‘लोकमत’ च्या वतीने गेल्या शैक्षणिक वर्षांत ‘संस्काराचे मोती’ या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या ‘हवाई सफर’ स्पर्धेत हिंगोलीतील माणिक स्मारक आर्य विद्यालयाचा आठवीतील विद्यार्थी अभिषेक संजय मेथेकर हा मानकरी ठरला आहे. याबद्दल विद्यालयाच्या वतीने अभिषेकचा मंगळवारी एका कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
‘लोकमत’ च्या वतीने ‘संस्काराचे मोती’ या उपक्रमांतर्गत गेल्या शैक्षणिक वर्षांत १ जुलै ते १० आॅगस्ट २०१३ या कालावधीत जिल्ह्यात स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतून लक्की ड्रॉ द्वारे एका विद्यार्थ्याची ‘मुंबई-दिल्ली- मुंबई’ या हवाई सफरसाठी निवड करावयाची होती. त्यामध्ये हिंगोलीतील माणिक स्मारक आर्य विद्यालयातील आठवीचा विद्यार्थी अभिषेक संजय मेथेकर हा भाग्यवान ठरला. त्यामुळे अभिषेक आता लवकरच ‘मुंबई-दिल्ली-मुुंबई’ ही हवाई सफर करणार आहे. या दरम्यान महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना दिल्ली येथील विविध एैतिहासिक स्थळांना भेटी देता येणार आहेत. तशी व्यवस्था ‘लोकमत’ च्या वतीने करण्यात येणार आहे.
दरम्यान, या स्पर्धेतील हवाई सफर मानकरी ठरलेला विद्यार्थी अभिषेक मेथेकर याचा मंगळवारी माणिक स्मारक आर्य विद्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी अभिषेकने मनोगत व्यक्त करताना ‘लोकमत’ चे संस्काराचे मोती सदर विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक असल्याचे सांगितले. स्पर्धा परिक्षेसाठी त्याचा विद्यार्थ्यांना लाभ होणार असल्याचे अभिषेक म्हणाला. यावेळी संस्थेचे विश्वस्त तथा प्रशासकीय अधिकारी अनिलकुमार भारूका यांनी ‘लोकमत’ च्या या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचे सदर ‘लोकमत’ ने सुरू केले असून, त्याचा त्यांच्या भावी आयुुष्यात मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने संस्काराचे मोती या स्पर्धेत सहभागी होऊन आपले ज्ञान वृद्धींगत करावे, असे आवाहन भारूका यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक एस.यु. सूर्यवाड, उपमुख्याध्यापक एम.एम. लोकडे, पर्यवेक्षक एस.एस. क्यातमवार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ए.एम. पत्की यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)