अनैतिक संबंधातून तरुणाचा खून, लाकडी दांडक्याने केला डोक्याचा भुगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 15:53 IST2024-03-07T15:53:00+5:302024-03-07T15:53:24+5:30

गंगापूर शिवारातील भागाठाण शिवारात आढळला मृतदेह; पोलिसांनी एकास घेतले ताब्यात

A young man was killed in an immoral relationship, beheaded with a wooden stick | अनैतिक संबंधातून तरुणाचा खून, लाकडी दांडक्याने केला डोक्याचा भुगा

अनैतिक संबंधातून तरुणाचा खून, लाकडी दांडक्याने केला डोक्याचा भुगा

लासूर स्टेशन : लाकडाच्या दांड्याने डोक्यावर हल्ला करून एक तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना गंगापूर तालुक्यातील भागाठाण शिवारात ६ मार्च रोजी सायंकाळी ५:०० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

शिवाजी भानुदास चोरमल (वय ४० वर्षे, रा. महाकलवाडगाव, ता. श्रीरामपूर, जि. नगर) असे मृताचे नाव आहे.  याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भागाठाण शिवारात ऊसतोड कामगार वास्तव्यास आले आहेत. या कामगारांच्या वस्तिकडे शिवाजी मोटारसायकलने आला होता. मात्र, याच शिवारात त्याचा लाकडाच्या दांड्याने डोक्यावर हल्ला करून खून करण्यात आला. 

दरम्यान, या घटनेची माहिती मिळतात शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोरखनाथ शेळके, फौजदार नजीर शेख, पोलिस अंमलदार श्रीकृष्ण दाणी, तात्यासाहेब बेंद्रे, उमेश गुडे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. उत्तरीय तपासणीचे काम सिद्धनाथ वाडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री उशिरापर्यंत चालू होते. दरम्यान, याप्रकरणी मृताच्या गावातील संदीप रामनाथ महांकाळे यास संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस चौकशीत हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे पुढे आले आहे.

Web Title: A young man was killed in an immoral relationship, beheaded with a wooden stick