महागडी दारू गुजरातमध्ये विक्रीसाठी नेणारा तस्कर पकडला
By राम शिनगारे | Updated: September 24, 2022 19:51 IST2022-09-24T19:51:03+5:302022-09-24T19:51:23+5:30
मद्य विरोधी पथकाची कारवाई : ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त

महागडी दारू गुजरातमध्ये विक्रीसाठी नेणारा तस्कर पकडला
औरंगाबाद : गुजरातमध्ये दारुबंदी असल्यामुळे महागड्या विदेशी दारुची ट्रकमधुन तस्करी करणाऱ्या चालकाला अवैध मद्य विरोधी पथकाने छापा मारुन पकडले. या चालकाकडून ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच त्याच्या विरोधात एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.
अवैध मद्य विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर अवघड यांचे पथक गस्तीवर असताना बिपीन बालगिरी गोस्वामी (रा. डबासंग, जि. जामनगर) हा विदेशी मद्याचा साठा घेऊन ओयासिस चौक, पुंढरपुरकडे येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार छापा मारुन पंढरपुरकडे येताना पकडले. बिपीन याची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे महागड्या विदेशी मद्याच्या २१ बॉटल सापडल्या.या बाॅटलची ४५ हजार ६५० रुपये एवढी किंमत आहे. गुजरातमध्ये दारु विक्री बंद असल्यामुळे गुजरातमध्ये विक्रीसाठी दारु घेऊन जात असल्याचे आरोपींने सांगितले. ही कामगिरी निरीक्षक आघाव यांच्या मार्गदर्शनात सपोनि ज्ञानेश्वर अवघड, हवालदार मनोज चव्हाण, सुनील जाधव, परशुराम सोनुने, नितेश सुंदर्डे, अभिजित गायकवाड आणि आरती कुसाळे यांच्या पथकाने केली.