Video: औरंगाबादेत धावत्या ऑटोरिक्षाला आग, मोठा अनर्थ टळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 13:13 IST2023-01-18T13:13:26+5:302023-01-18T13:13:50+5:30
धावत्या ऑटोरिक्षात आग; रस्त्याच्या बाजूला घेऊन चालक बाहेर निघाला.

Video: औरंगाबादेत धावत्या ऑटोरिक्षाला आग, मोठा अनर्थ टळला
औरंगाबाद: जालना रोडवर हायकोर्टसमोर आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास एका धावत्या सीएनजी ऑटोरिक्षाला आग लागली. चालकाच्या सिटखाली लागलेली आग अवघ्या काही मिनिटांत संपूर्ण ऑटोरिक्षात पसरली. दरम्यान, अग्निशमन दलाने लागलीच धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.
याबाबत अधिक माहिती अशी की, बायजीपुरा येथे राहणारा रिक्षा चालक चिकलठाणा येथून घराकडे निघाला होता. अकरा वाजेच्या सुमारास हायकोर्टसमोर रिक्षा आल्यानंतर अचानक समोरच्या सिटखाली आग लागल्याचे निदर्शनास आले. ऑटोरिक्षा लागलीच रस्त्याच्या बाजूला घेऊन चालक बाहेर निघाला. त्यानंतर काही क्षणातच आग संपूर्ण ऑटोरिक्षात पसरली. जवळच असलेल्या अग्निशमन विभागाला माहिती मिळताच एक बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाने लागलीच आगीवर नियंत्रण मिळवले. आगीत ऑटोरिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी ऑटोरिक्षात इतर प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला.