छत्रपती संभाजीनगरच्या भगवान महावीर चौकात चालत्या कारने घेतला पेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 12:44 IST2025-12-05T12:43:58+5:302025-12-05T12:44:22+5:30
कारच्या समोरील भागातून अचानक धूर निघण्यास सुरुवात झाली. क्षणार्धात कारने पेट घेतला.

छत्रपती संभाजीनगरच्या भगवान महावीर चौकात चालत्या कारने घेतला पेट
छत्रपती संभाजीनगर : भगवान महावीर चौकात (बाबा चौक) गुरुवारी रात्री १०.१५ वाजता सिग्नलवर थांबलेल्या कारने पेट घेतला. क्रांतीनगरमधील साळवे नामक तरुण त्यांच्या कारने (एम एच २० जी ई ९०८५) क्रांतीचौकाकडून नगर नाक्याच्या दिशेने जात होते.
साधारण १०.१५ वाजता भगवान महावीर चौकात सिग्नल लागल्याने साळवे थांबले. त्याच दरम्यान कारच्या समोरील भागातून अचानक धूर निघण्यास सुरुवात झाली. क्षणार्धात कारने पेट घेतला. यामुळे चौकात चोहो बाजूने वाहतूक खोळंबली होती.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांसह अग्निशमन विभागाचे सूरज राठोड यांनी पथकासह धाव घेत आग नियंत्रणात आणली. घटनेवेळी साळवे एकटेच कारमध्ये होते. वेळीच घटना लक्षात आल्याने साळवे कार बाहेर उतरल्याने अनुचित प्रकार टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.