सिल्लोडजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत मोपेडस्वार जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 20:08 IST2022-07-14T20:07:10+5:302022-07-14T20:08:50+5:30
अपघातानंतर धडक देणारे वाहन न थांबता तेथून भरधाव वेगात निघून गेले.

सिल्लोडजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत मोपेडस्वार जागीच ठार
सिल्लोड (औरंगाबाद) : जळगाव-औरंगाबाद रस्त्यावरील डोंगरगाव फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मोपेडस्वार जागीच ठार झाला. हा अपघात गुरुवारी दुपारी झाला. नितीन बोरसे ( रा वांगीबुद्रुक) असे मृताचे नाव आहे.
नितीन बोरसे हा युवक आज दुपारी काही कामानिमित्त मोपेडवरून ( क्रमांक एम एच २९ ए डी २३५८ ) सिल्लोडकडे जात होता. दरम्यान डोंगरगाव फाट्या जवळील पाणी फिल्टरजवळ अज्ञात वाहनाने मोपेडला धडक दिली. यात गंभीर जखमी झालेला नितीनचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर धडक देणारे वाहन न थांबता भरधाव वेगात तेथून निघून गेले.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी घटनास्थळी धाव घेतली. सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी शोकाकुल वातावरणात वांगी येथे मृतावर अंतिम संस्कार करण्यात आले.