लाईनमन दिनाच्या आदल्या दिवशी महावितरणच्या पथकाला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 15:57 IST2023-03-04T15:56:59+5:302023-03-04T15:57:26+5:30

वाघदावाडी येथील घटना एका विरुद्ध गुन्हा दाखल

A day before the Lineman's Day, Mahavitaran's team was beaten up | लाईनमन दिनाच्या आदल्या दिवशी महावितरणच्या पथकाला मारहाण

लाईनमन दिनाच्या आदल्या दिवशी महावितरणच्या पथकाला मारहाण

सिल्लोड: थकीत वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या पथकाला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी ( दि.३) दुपारी १२.३० वाजता  एका इसमाने मारहाण केली. याप्रकरणी विद्युत सहायक यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिल्लोड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, लाईनमन दिनाच्या आदल्यादिवशी ही घटना. 

विशाल गोवर्धन बैरागी वय २४ वर्ष विद्युत सहायक भराडी सर्कल यांनी दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, आम्ही वसुली पथक सोबत वाघदावाडी येथे गेलो होतो. यावेळी रामसिंग यांना थकीत वीज बिल का भरले नाही याबाबत विचारणा केली असता त्यांनी पथकाला शिविगाळ करून दगड फेकून मारला. यावरून सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांच्या आदेशाने रामसिंग सरदारसिंग महेर ( रा.वाघदावाडी ता सिल्लोड ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास फौजदार विकास आडे हे करत आहे.

 

Web Title: A day before the Lineman's Day, Mahavitaran's team was beaten up